जिल्हा नियोजन समिती आणि कार्यकारी समित्या वरील सर्व नामनिर्देशित पदे रद्द, शासन निर्णय.

जिल्हा नियोजन समिती आणि कार्यकारी समित्या वरील सर्व नामनिर्देशित  सदस्य व  पदे रद्द, शासन निर्णय.

 

रत्नागिरी : (वार्ताहर) राज्यातील सर्व जिल्हा नियोजन समित्यांच्या कार्यकारी समित्यांवर नामनिर्देशित सदस्य तसेच विशेष निमंत्रित सदस्य म्हणून शासनाकडून करण्यात आलेल्या नियुक्त्या त्वरित प्रभावाने रद्द करण्यात आल्याचा शासन निर्णय अवर सचिव सु. वि. कांबळी यांनी २८ जानेवारी रोजी प्रसिध्द केला आहे.

या शासन निर्णयात म्हटले आहे, महाराष्ट्र जिल्हा नियोजन समिती (रचना व कामे) (सुधारणा) अधिनियम २००० मधील कलम ३ (३)(२)(ब) व (क) आणि कलम ३ (३) (४) (फ) मधील तरतुदीनुसार राज्यातील सर्व जिल्हा नियोजन समित्यांवर नामनिर्देशित सदस्य व विशेष निमंत्रित सदस्य म्हणून राज्य शासनाकडून करण्यात आलेल्या नियुक्त्या तसेच महाराष्ट्र जिल्हा नियोजन समिती (सभा घेणे) (सुधारणा) नियम २०१८ च्या अधिसूचनेतील परिच्छेद ७ (मूळ अधिनियमाचा नियम ६-अ) मधील तरतुदीनुसार राज्यातील जिल्हा नियोजन समित्यांच्या कार्यकारी समित्यांवर नामनिर्देशित सदस्य तसेच विशेष निमंत्रित सदस्य म्हणून शासनाकडून करण्यात आलेल्या नियुक्त्या त्वरित प्रभावाने रद्द करण्यात येत आहेत.

हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा संगणक सांकेतांक 202501281657414616 असा आहे.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिव एम. देवेंदर सिंह यांनी या शासन निर्णयाबाबत जिल्ह्यातील विशेष निमंत्रित सदस्य आणि निमंत्रित सदस्यांना पत्राद्वारे अवगत केले आहे.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें