राजापूर हातिवले जैतापूर बससेवा कायमस्वरूपी सुरू ठेवण्याची विनंती… प्रवाशांची मागणी.

जैतापूर पंचक्रोशीतील प्रवाशांची महत्त्वपूर्ण मागणी –

 

राजापूर हातिवले जैतापूर बससेवा कायमस्वरूपी सुरू ठेवण्याची विनंती.

 

✍️राजू सागवेकर /राजापूर 

 

▪️ जैतापूर पंचक्रोशीतील ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय नेत्यांनी राजापूर आगार प्रमुख यांना निवेदन पाठवून राजापूर-हातिवले-जैतापूर मार्गावरील दुपारच्या 15.30 वा. सुटणाऱ्या एसटी सेवेचे महत्त्व लक्षात घेऊन ती कायमस्वरूपी सुरू ठेवण्याची विनंती केली आहे.

 

▪️ सध्या या मार्गावर सकाळी 11.15 वा. टपाल गाडी सुटल्यानंतर संध्याकाळी 18.30 वाजेपर्यंत कोणतीही परतीची एसटी सेवा उपलब्ध नाही. त्यामुळे कार्यालयीन कामांसाठी, खाजगी प्रवासासाठी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी हा मोठा अडथळा निर्माण होतो.

 

▪️ दिनांक 22 जानेवारी 2025 पासून सुरू झालेल्या राजापूर-हातिवले-जैतापूर बससेवेला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः विद्यार्थ्यांना या सेवेमुळे प्रवासाची मोठी सोय झाली आहे. तसेच सायंकाळी 16.50 वा. जैतापूर-तुळसुंदे-पडवे-विल्ये-राजापूर बससेवा देखील या मार्गावरील प्रवाशांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे.

 

▪️ या पार्श्वभूमीवर ही बससेवा नियमित आणि कायमस्वरूपी सुरू ठेवावी अशी मागणी जैतापूर पंचक्रोशीतील ग्रामपंचायत सदस्य, सरपंच आणि स्थानिक सामाजिक कार्यकर्ते यांनी केली आहे.

 

▪️ एसटी प्रेमी दिवाकर आडविरकर यांनी या मागणीसाठी पुढाकार घेतला असून, प्रवाशांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी या मागणीची दखल घ्यावी आणि बससेवा नियमित सुरू ठेवावी, अशी सर्व स्तरातून अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Raju Sagvekar
Author: Raju Sagvekar

???? राजू सागवेकर ???? वार्ताहर (ग्रामीण ) - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमीपत्र ता.राजापुर - 416702

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें