रत्नागिरी जिल्हा भारत स्काऊट गाईड आणि जिल्हा परिषद रत्नागिरी आयोजित, जि प केंद्रशाळा साठवली चे उज्वल यश.

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

रत्नागिरी जिल्हा भारत स्काऊट गाईड आणि जिल्हा परिषद रत्नागिरी आयोजित, जि प केंद्रशाळा साठवली चे उज्वल यश.

जितेन्द्र चव्हाण (लांजा वार्ताहर).

लांजा –  रत्नागिरी जिल्हा भारत स्काऊट गाईड व जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 3/2/ 2025 ते 4/2/2025 या दोन दिवसात कब बुलबुल जिल्हा मेळावा द एज्युकेशन सोसायटी कडवई तालुका संमेश्वर येथे आयोजित करण्यात आला होता.

 

जि. प. केंद्रशास साटवली मराठी ता. लांजा या शाळेचे विद्यार्थी या मेळाव्यात सहभाग झाले होते. या मेळाव्यात सांस्कृतिक नृत्य स्पर्धेत जि.प केंद्रशाळा साटवली मराठी या शाळेने द्वितीय क्रमांक पटकावला. त्यांना मा. श्री. कासार साहेब शिक्षणाधिकारी प्राथमिक जि.प.रत्नागिरी यांनी शील्ड देऊन विद्यार्थ्यांना सन्मानित केले.

 

तसेच समूहगीत गायन स्पर्धेत ही या शाळेने द्वितीय क्रमांक मिळवला. माननीय श्री. कडव साहेब उपशिक्षणाधिकारी जि. प रत्नागिरी यांच्या हस्ते शील्ड देऊन त्याचा गौरव करण्यात आला.

 

शाळेतील विद्यार्थी कु.अवधूत प्रथम भालेकर, कु.माहीर महेंद्र नारकर, कु.देवाशं विश्वास संसारे, कु.समर्थ योगेश बाणे, कु.रियांश रमेश मोये, कु. अंश लवेश सावंत, कु.हुसेन मुनीर इसफ हे विद्यार्थी मेळाव्यात सहभागी झाले होते.

 

जि. प. केंद्र शाळा साटवली चे सोबत कब मास्टर श्री. दिलीप दिवाळे हे सहभागी झाले होते.

 

या शाळेचे विद्यार्थ्यांचे श्री. नारकर शालेय व्यवस्थापन समिती साटवली यांनीही विद्यार्थी शिक्षक मुख्याध्यापक पालक या सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

 

याकरता कु. रिया शेरे, श्रीमती. मयुरी शिंदे मॅडम व श्री. लगदिवे सर यांनी विशेष मेहनत घेतली.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]