प्रसिध्द क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचे निधन
Post Views:110
प्रख्यात क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचे निधन..
मुंबई– प्रख्यात क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. संझगिरी यांनी मुंबईतील लीलावती रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. त्यांच्या निधनाने क्रीडा क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. द्वारकानाथ संझगिरी यांच्या पार्थिवावर उद्या शुक्रवारी दुपारी १२ वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होतील.
संझगिरी यांनी मराठी भाषेत क्रिकेट लेखनाच्या माध्यमातून क्रिकेटप्रेमींना वेगळ्या शैलीत हा खेळ समजावून सांगितला. त्यांचे हलक्याफुलक्या शैलीतील लेखन आणि समालोचन चाहत्यांना नेहमीच भावत राहिले. सिव्हिल इंजिनियरिंगचे शिक्षण घेतलेल्या संझगिरी यांनी मुंबई महापालिकेत उच्च पदावर काम केले, मात्र क्रिकेटवरील प्रेम आणि लेखनकौशल्यामुळे ते लोकप्रिय समीक्षक झाले. द्वारकानाथ संझगिरी यांचा जन्म मुंबईत दादर येथील हिंदू कॉलनीत झाला. त्यांचं शालेय शिक्षण किंग्ज जॉर्ज तर महाविद्यालयीन शिक्षण रामनारायण रुईयामध्ये झालं. यानंतर व्हीजेटीआयमधून त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं.
क्रीडा क्षेत्रातील समीक्षणाबरोबरच संझगिरी यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेत अभियंता म्हणून नोकरी केली. 2008 मध्ये ते मुख्य अभियंता आणि त्यानंतर पाणीपुरवठा प्रकल्प म्हणून सेवानिवृत्त झाले. नव्वदच्या दशकाच्या उत्तरार्धापासून संझगिरी एकपात्री स्टँडअप टॉक शो करत आहेत आणि त्यांनी आजपर्यंत हजाराहून अधिक असे कार्यक्रम केले आहेत. द्वारकानाथ संझगिरी यांनी १९७० च्या उत्तरार्धात त्यांनी आपल्या लेखन कारकीर्दीला सुरुवात केली होती. भारताने १९८३ चा वर्ल्ड कप जिंकल्यानंतर संझगिरी यांनी ‘एकच षटकार’ हे पाक्षिक क्रीडा मासिक सुरू केले होते. याचे ते संपादक होते. फेसबूकवरही ते क्रिकेट आणि चित्रपटांविषयी लिहायचे, हे लिखान युवा पिढीला खूप आवडायचे. द्वारकानाथ संझगिरी स्तंभलेखनासोबतच प्रवास, सामाजिक समस्या, क्रीडा आणि चित्रपट अशा विविध विषयांवर ४० पुस्तके लिहिली आहेत.

Author: Sujit Surve.
⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕
SHARE:
राजापुरात मन हेलावून टाकणारी दुर्घटन ,नाणार इंगळवाडीत खाडीत बुडून एकाच कुटुंबातील ४ मुलांचा मृत्य
माशी मारायला हातोडा कशाला?
आदिशक्तीच्या पाऊलखुणांचा शोध — लेखमाला भाग-२ त्रिपुरसुंदरी : सौंदर्याच्या पलीकडची सृजनशक्ती
खामशेत ग्रामपंचायतीची राज्यात द्वितीय क्रमांकाची कामगिरी; गुहागर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा!
हेदवी येथे आई श्री. भगवती देवीचा नवरात्रोत्सव; २० ऑक्टोबरपर्यंत भाविकांना दर्शनाची संधी
खोडदे येथे आई नवलाई देवीचा दसरा (दसरा गवर) उत्सव विविध कार्यक्रमांनी जल्लोषात साजरा होणार
Horoscope
Weather

आदिशक्तीच्या पाऊलखुणांचा शोध — लेखमाला भाग-१, कामाख्या : सृजनशक्तीची अखंड तेवणारी ज्योत
डोंबिवलीची मानवी कोळथरकर आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकणार; बालीतील डान्स स्पर्धेसाठी भारताकडून निवड!
लांजा तालुक्यात रानडुकरांचा उपद्रव; साटवलीतील शेतकऱ्याची भातशेती उद्ध्वस्त