कार्य तत्पर व प्रामाणिक एस टी चालक -श्री अरविंद रेडीज

कार्य तत्पर व प्रामाणिक एस टी चालक -श्री अरविंद रेडीज

तळवली (मंगेश जाधव)       

परचूरीतून (वस्तीची) सकाळी 06:15 ला सुटणारी एस टी परचूरी – गुहागर अशा दर रोज जाणाऱ्या एस टी तुन हायस्कूल व महाविद्यालयीन विद्यार्थ्यी प्रवास करत असतात अश्यातच दोन दिवसांपूर्वी परचूरी सरपंच स्टाॅप ते तळवली महाविद्याल(हायस्कूल)असा प्रवास करणारी विद्यार्थ्यीनी कुमारी समायरा शाहनवाज चोगले ही तळवली या ठिकाणी उतरल्यानंतर तीच्या लक्षात आले की तीच्या काणातील सोन्याची रिंग कुठे तरी पडलीय तीने लगेचच परचूरी येथे तीच्या आईला सांगितले आईने परचूरी येथील सामाजिक कार्यकर्ते श्री.अब्रार चोगले यांच्याजवळ सदरील बाब लक्षात आणून दिली श्री.अब्रार चोगले यांनी लगेचच त्यादिवशी एस टी वर असणारे चालक श्री.अरविंद उर्फ बाबु रेडीज यांच्याजवळ फोन वरून हरवलेल्या रिंग बद्दल सांगताच चालक श्री.रेडीज, वाहक व विद्यार्थ्यी यांनी संपूर्ण एस टी मध्ये शोधून काढली व लगेचच रिंग मिलाल्याच सांगीतले व सदरील रिंग स्वत परचूरी येथे येऊन समाईरा हिच्या आई वडीलांच्या सुपूर्द केली सदर विद्यार्थ्यींनीचे वडील श्री.शहानवाज चोगले हे मुख बधिर असून ते गावातच मोल मजुरी करतात

त्यामुळे श्री.अरविंद रेडीज यांचे संपूर्ण पंचक्रोशीतुन अभिनंदन केले जात आहे

सदर वेळी परचूरीतील सामाजिक कार्यकर्ते श्री.विलास गमरे तळवली येथील सामाजिक कार्यकर्ते श्री.संतोष पवार श्री.अब्रार चोगले श्री.शाहनवाज चोगले श्री.संतोष पवार श्री.सुहेल चोगले कु.अफान नागजी सौ.नुरबानू नागजी सौ फैमीदा उपस्थित होते

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें