८ रोजी आबलोली येथे महिला जागतिक दिनी पाणलोट क्षेत्र रथयात्रा आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

८ रोजी आबलोली येथे महिला जागतिक दिनी पाणलोट क्षेत्र रथयात्रा आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन.

८ रोजी आबलोली येथे महिला जागतिक दिनी पाणलोट क्षेत्र रथयात्रा आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन

 

निर्मल ग्रामपंचायत आबलोली आणि पाणलोट विकास समीती यांचा स्तुत्य उपक्रम

आबलोली (संदेश कदम) 

गुहागर तालुक्यातील स्वर्गीय वसंतराव नाईक पुरस्कार प्राप्त निर्मल ग्रामपंचायत आबलोली व पाणलोट विकास समीती आबलोली यांचे संयुक्त विद्यमाने शनिवार दि. ०८ मार्च २०२५ रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना २.० अंतर्गत पाणलोट क्षेत्र रथयात्रा शुभारंभ व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे

दिनांक ०८ मार्च २०२५ रोजी सकाळी ०७:३० वाजता स्वर्गीय वसंतराव नाईक पुरस्कार प्राप्त निर्मल ग्रामपंचायत आबलोली येथून मान्यवरांच्या हस्ते झेंडा दाखवून डि. एड्. कॉलेज आबलोली येथे विद्यार्थ्यां समवेत पाणलोट क्षेत्र रथयात्रा (रॅली)काढण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी ०८:०० वाजता प्रमुख पाहुणे व पंचायत समिती गुहागरचे गटविकास अधिकारी शेखर शामराव भिलारे यांचे हस्ते पाणलोट रथाचे उदघाटन होणार आहे. त्यानंतर सकाळी ०८:०० ते ०८:३० या वेळेत मान्यवरांच्या हस्ते जलपूजन,वृक्ष पुजन होणार असून त्यानंतर सकाळी ०८:३० ते ०९:०० या वेळेत इशस्तवन व मान्यवरांचे स्वागत करण्यात येणार असून सकाळी ०९:०० ते ०९:३० प्रास्ताविक व मान्यवरांचे मनोगत होणार आहे त्यानंतर जलसंरक्षण व मृदा संरक्षण शपथ ग्रहण करण्यात येणार आहे.त्यानंतर सकाळी ०९:३० ते १०:३० या वेळेत मान्यवरांच्या हस्ते पाणलोट योध्दा व धारिणीताई यांना प्रमाणपत्र वितरण आणि विद्यार्थी बक्षीस वितरण कार्यक्रम होणार असून सकाळी १०:३० ते ११:०० या वेळेत पथनाट्य सादर होणार असून सकाळी ११:०० ते ११:३० या वेळेत पाणलोट अभ्यास सहल आभासी अनुभव त्यानंतर अल्पोपहार असा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा समन्वयक जास्मीन गार्दी, प्रकल्प कार्यान्वित यंत्रणा निलम पालव, ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग गुहागरचे उप अभियंता मंदार छत्रे, आबलोलीच्या सरपंच सौ.वैष्णवी वैभव नेटके, ग्रामपंचायत अधिकारी बाबूराव सुर्यवंशी, उपसरपंच अक्षय पागडे, तंटामुक्ती समीती आबलोलीचे अध्यक्ष आप्पा कदम, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना २.० समीती आबलोली अध्यक्ष,सचिव तसेच निर्मल ग्रामपंचायत आबलोलीचे सर्व सदस्य, पाणलोट विकास समीती आबलोली क्लस्टर ५ आदी. सर्व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

???? जागतिक महिला दिनानिमित आमचा हा विशेष लेख ही वाचा ???? ????????

त्यानंतर स्वर्गीय वसंतराव नाईक पुरस्कार प्राप्त निर्मल ग्रामपंचायत आबलोली यांचे संयुक्त विद्यमाने लगेचच डि. एड्. कॉलेज आबलोली येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला जागतिक दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. यामध्ये मान्यवरांचे स्वागत झाल्यानंतर प्रमुख मार्गदर्शक म्हणून सौ. स्नेहल सचिन बाईत, डॉ. गौरी काटदरे, डॉ. ऋतुजा गंगावणे आदी. मान्यवर उपस्थित राहून मौलिक मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.त्यानंतर उपस्थित सर्वांसाठी जेवण ठेवण्यात आले आहे.त्यानंतर महिलांसाठी फणी गेमचे आयोजन करण्यात आले आहे . या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. कल्याणी नेटके या करणार असून महिलांनी या कार्यक्रमाला वेळेत बहुसंख्येने उपस्थित रहावे असे जाहीर आवाहन स्वर्गीय वसंतराव नाईक पुरस्कार प्राप्त निर्मल ग्रामपंचायत आबलोली यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]