आबलोलीचे सुपूत्र सचिन कारेकर यांचा पाणलोट योध्दा पुरस्काराने गौरव – आबलोली ग्रामपंचायत आणि पाणलोट विकास समीती आबलोली यांचा स्तुत्य उपक्रम

आबलोलीचे सुपूत्र सचिन कारेकर यांचा पाणलोट योध्दा पुरस्काराने गौरव – आबलोली ग्रामपंचायत आणि पाणलोट विकास समीती आबलोली यांचा स्तुत्य उपक्रम

आबलोलीचे सुपूत्र सचिन कारेकर यांचा पाणलोट योध्दा पुरस्काराने गौरव – आबलोली ग्रामपंचायत आणि पाणलोट विकास समीती आबलोली यांचा स्तुत्य उपक्रम

आबलोली (संदेश कदम) 

गुहागर तालुक्यातील आबलोली गावाचे सुपुत्र आणि राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्राप्त,प्रगतशील शेतकरी आबलोली भूषण सचिन कमलाकर कारेकर यांचा गुहागर तालुक्यातील आबलोली येथील डि. एड्. कॉलेज आबलोलीच्या सभागृहात पाणलोट क्षेत्र रथयात्रा आणि विविध कार्यक्रम तसेच जागतिक महिला दिन कार्यक्रमात वसंतराव नाईक पुरस्कार प्राप्त निर्मल ग्रामपंचायत आबलोली व पाणलोट विकास समीती आबलोली यांचे वतीने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक – २.० पाणलोट यात्रा , “पाणलोट योद्धा” हा पुरस्कार देऊन सचिन कमलाकर कारेकर यांना गुहागर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांचे हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत गौरवण्यात आले, सन्मानित करण्यात आले.

यावेळी विचारपीठावर जलसंधारण विभाग पाणलोट क्षेत्र प्रकल्प कार्यान्वित यंत्रणा आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षा निलम पालव मॅडम, दिल्ली येथील भुमी संधारण विभागाच्या टेक्निकल एक्सपर्ड श्वेता नारायण मॅडम, जिल्हा समन्वयक जस्मिन गार्दी, तालुका कृषी अधिकारी अमोल शिरसागर, ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग गुहागरचे उप अभियंता मंदार छत्रे, आबलोलीच्या सरपंच सौ. वैष्णवी वैभव नेटके, ग्रामपंचायत अधिकारी बाबूराव सुर्यवंशी,काजुर्ली गावच्या सरपंच मेघना मोहिते, काजुर्लीचे माजी सरपंच डॉ. आनंद जोशी,तंटामुक्ती समीती आबलोलीचे अध्यक्ष आप्पा कदम, आबलोलीच्या बचगट सीआरपी मिनल कदम, मुख्याध्यापिका नेत्रा रहाटे, उपसरपंच अक्षय पागडे आदी. मान्यवर उपस्थित होते. हा संपूर्ण कार्यक्रम स्वर्गीय वसंतराव नाईक पुरस्कार प्राप्त निर्मल ग्रामपंचायत आबलोली व पाणलोट विकास समीती यांचे संयुक्त विद्यमाने उत्साहात संपन्न झाला या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितेश पांचाळ यांनी केले

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें