जागतिक महिला दिनानिमित्त, रत्नागिरी परीट समाजाच्या भगिनींनी  रत्नागिरीतील बाल सुधारगृहाला सदिच्छा भेट दिली. 

जागतिक महिला दिनानिमित्त, रत्नागिरी परीट समाजाच्या भगिनींनी  रत्नागिरीतील बाल सुधारगृहाला सदिच्छा भेट दिली. 

रत्नागिरी -जागतिक महिला दिनानिमित्त, रत्नागिरी परीट समाजाच्या भगिनींनी 8 मार्च रोजी रत्नागिरीतील बाल सुधारगृहाला सदिच्छा भेट दिली. या भेटीत त्यांनी अनाथ मुलांना ब्लॅंकेट, शैक्षणिक आणि चित्रकला साहित्य, तसेच खाऊचे वाटप केले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि सिंधुताई सपकाळ यांच्या स्मृतींना उजाळा देत, या भगिनींनी अनाथ मुलांच्या मायेची भूमिका निभावल्याचे समाधान व्यक्त केले.

 

या कार्यक्रमात परीट समाज भगिनी मंडळाच्या अध्यक्ष स्वप्नाली प्रीतम पावसकर, उपाध्यक्ष गार्गी वीरेंद्र कोरगावकर, सचिव प्रणिती मंगेश नाचणकर, खजिनदार स्मिता मंदार कोरगावकर, तसेच इतर सदस्य आणि ज्येष्ठ सल्लागार भगिनी उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संत गाडगेबाबा यांच्या शिकवणीनुसार शिक्षण घेऊन राष्ट्राचे आदर्श नागरिक बनण्याचे संदेश दिले.

 

बाल सुधारगृहाचे अधीक्षक प्रथमेश वायंगणकर आणि शिक्षक विनोद पोवार यांनी या उपक्रमाचे स्वागत केले आणि विद्यार्थ्यांसाठी दिलेल्या भेटवस्तू आणि खाऊचा स्वीकार केला. संस्थेने महिलांना या उपक्रमासाठी दिलेल्या सहकार्याबद्दल भगिनी मंडळाने त्यांचे आभार मानले.

Prachi Sutar
Author: Prachi Sutar

Prachi Sutar - Ratnagiri. *Digital media creators* Office clark.PR.

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें