घंटागाडी सेवेत नाही—१८ मार्चला लाक्षणिक उपोषणाचा इशारा

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

घंटागाडी सेवेत नाही—१८ मार्चला लाक्षणिक उपोषणाचा इशारा

रत्नागिरी निलेश रहाटे 

“घंटागाडी आली हो… कचरा गाडी आली!” असे सुमधूर गाणे ऐकू आले की, नागरिकांची पावले आपोआप गाडीच्या दिशेने वळतात. मात्र, वाटद-मिरवणे ग्रामपंचायतीने १५ व्या वित्त आयोगातून मार्च २०२४ मध्ये खरेदी केलेली घंटागाडी अद्याप सेवेत दाखल झालेली नाही.

 

या संदर्भात नागरिकांनी वारंवार ग्रामपंचायतीकडे विचारणा केली असता, “अजून नियोजन बाकी आहे, लवकरच सुरू करू,” असे उत्तर मिळत आहे. मात्र, नियोजनाचा अभाव असल्याने नागरिकांचा रोष वाढत चालला आहे. निधी खर्च झाला असतानाही प्रत्यक्ष सेवा सुरू न झाल्याने नागरिकांत असंतोष निर्माण झाला आहे.

 

या परिस्थितीचा निषेध म्हणून माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे मुख्य प्रचारप्रमुख आणि पत्रकार श्री. निलेश रहाटे तसेच गावातील काही जागृत नागरिक १८ मार्च २०२५ रोजी सकाळी १० वाजता ग्रामपंचायत कार्यालयासमोर घंटागाडीवर बसून लाक्षणिक उपोषण करणार आहेत. १५ मार्चपर्यंत घंटागाडी सुरू न केल्यास हे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संबंधित विभागाला देण्यात आला आहे.

 

ग्रामस्थांनी प्रशासनाने त्वरित पावले उचलून घंटागाडी कार्यान्वित करावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

 

Nilesh Rahate
Author: Nilesh Rahate

???? निलेश रहाटे ???? मिडिया प्रतिनिधि - रत्नागिरी वार्ताहर. ता. जिल्हा - रत्नागिरी

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]