जागतिक महिला दिनी आबलोली सरपंच सौ. वैष्णवी नेटके सन्मानित

जागतिक महिला दिनी आबलोली सरपंच सौ. वैष्णवी नेटके सन्मानित

आबलोली (संदेश कदम) – वसंतराव नाईक पुरस्कार प्राप्त निर्मल ग्रामपंचायत आबलोलीच्या सरपंच सौ. वैष्णवी वैभव नेटके यांना जागतिक महिला दिनानिमित्त पंचायत समिती, गुहागर व एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प, गुहागर यांच्या वतीने सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

गुहागर पंचायत समितीच्या वतीने आयोजित भव्य कार्यक्रमात पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांच्या हस्ते त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. आबलोली गावाच्या सर्वांगीण विकासासाठी समर्पित योगदान देणाऱ्या सरपंच सौ. वैष्णवी नेटके यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान करण्यात आला.

गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांनी त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देत सांगितले की, “आपण आपल्या कार्यक्षेत्रात अंतःकरणपूर्वक आणि प्रामाणिकपणे कार्य करीत आहात. यापुढेही असेच प्रेरणादायी कार्य करत राहा.”

या कार्यक्रमाला महिला संरक्षण अधिकारी माधवी जाधव, कृषी अधिकारी राजकुमार धायगुडे, एकात्मिक बालविकास प्रकल्प गुहागरच्या सुपरवायझर चैताली हळये, लिपीका सोलकर मॅडम, पर्यवेक्षिका माटल मॅडम, गुरव मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.

सौ. वैष्णवी नेटके यांच्या या सन्मानामुळे आबलोली ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण असून, त्यांच्या कार्याची प्रशंसा होत आहे.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें