कोकणात शिमगोत्सवाची धूम; संकासूर आणि गोमू ठरले आकर्षण

कोकणात शिमगोत्सवाची धूम; संकासूर आणि गोमू ठरले आकर्षण

 

तळवली (मंगेश जाधव प्रतिनिधी) – कोकणात शिमगोत्सवाला पहिल्या होळीपासून जोरदार सुरुवात झाली असून, गावागावात मोठ्या उत्साहात हा पारंपरिक सण साजरा केला जात आहे. विशेषतः संकासूर आणि गोमुचा नाच सर्वांसाठी मोठे आकर्षण ठरत आहे.

 

शिमगोत्सव हा कोकणातील लोकसंस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग असून, पारंपरिक कोकणी खेळ्यांनी त्याला एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे. पहिल्या होळीपासून सुरू झालेला हा सण ग्रामदैवतांच्या पालख्या वाडीवस्त्यांवर फिरवण्याने अधिक रंगतो. यावेळी नोकरीनिमित्त बाहेर असलेले गावकरी आपल्या मूळगावी परत येऊन आपल्या ग्रामदेवतेचे दर्शन घेतात, त्यामुळे गावात जत्रेचे स्वरूप पाहायला मिळते.

 

विशेष म्हणजे, दुसऱ्या होळीला अनेक गावांतील ग्रामदेवतेचे खेळे गावाभोवती फेरफटका मारतात. हे खेळे १०-११ दिवस अनवाणी पायाने आपल्या ग्रामदेवतेच्या गजरात संपूर्ण गाव फिरतात, त्यामुळे मोठ्या व लहान वयोगटातील भाविकांसाठी ते कुतूहलाचा विषय ठरतो.

 

यासोबतच, घराघरात होणारा संकासूर आणि गोमुचा नाच हा शिमगोत्सवातील खास आकर्षण ठरत आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच या संकासूराची मोठी क्रेझ असून, हुं हुं असा गजर करत त्याचा पाठलाग करणे हा या सणाचा खास भाग मानला जातो. कोकणात आलेले पर्यटकही संकासूर आणि गोमुचा नाच पाहण्यासाठी विशेषतः आकर्षित होत आहेत.

 

एकूणच, आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगातही कोकणातील पारंपरिक शिमगोत्सवाची संस्कृती जपली जात आहे,हे विशेष.

 

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें