पाटपन्हाळे महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण जयंती साजरी

पाटपन्हाळे महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण जयंती साजरी

तळवली (मंगेश जाधव)

गुहागर तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आय. क्यु. ए. सी. अंतर्गत सांस्कृतिक विभागाच्यावतीने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद देसाई यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

 

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद देसाई यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करण्यात आली. यावेळी डॉ. प्रमोद देसाई यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, साहित्यिक दृष्टीकोणातून थोडक्यात आढावा घेतला. उपस्थित प्राध्यापकवृंद व विद्यार्थी यांना यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

 

या कार्यक्रमाला सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. जालिंदर जाधव, डॉ. प्रवीण सनये, डॉ. प्रसाद भागवत, डॉ. दिनेश पारखे, प्रा. लंकेश गजभिये, प्रा. सौम्या चौघुले, प्रा. कांचन कदम, प्रा. सुभाष घडशी, महाविद्यालयातील कनिष्ठ लिपिक श्री. विश्वनाथ कदम, ग्रंथपाल श्री. धनंजय गुरव, ग्रंथालय परिचर श्री. परशुराम चव्हाण, श्री. नंदकुमार भेकरे, श्री. महेश झगडे व महावि‌द्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. जालिंदर जाधव यांनी केले तर उपस्थित मान्यवर व विद्यार्थांचे आभार प्रा. सौम्या चौघुले यांनी मानले.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें