मलठण येथे जागतिक महिला दिनानिमित्त कायदेशीर जनजागृती कार्यक्रम संपन्न

मलठण येथे जागतिक महिला दिनानिमित्त कायदेशीर जनजागृती कार्यक्रम संपन्न

अहिल्यानगर प्रतिनिधि नदकुमार बगाडे पाटील …

मलठण – कैलाश सत्यार्थी चिल्ड्रन्स फाऊंडेशनच्या वतीने मलठण येथे जागतिक महिला दिनानिमित्त कायदेशीर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. बाल मित्र ग्राम प्रकल्पामध्ये महिलांची भूमिका महत्त्वाची असल्याने त्यांना कायदेविषयक माहिती देण्यासाठी ॲड. अमृता खेडकर यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, “महिलांना कुठेही कायदेशीर मदतीची गरज भासल्यास वकील संघटना नेहमीच त्यांच्या मदतीला तत्पर राहील.”

 

यावेळी पोलिस विभागात नव्याने रुजू झालेल्या निकिता फलके यांनी महिलांना प्रोत्साहन देताना सांगितले की, “प्रत्येक आईने आपल्या मुलीची मैत्रीण बनले पाहिजे. तसेच, संकटात सापडलेल्या महिलांनी २४ तास सेवेत तत्पर असलेल्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा.”

 

या कार्यक्रमात समाजामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मलठण, निमगाव भोगी, आणि कवठे येमाई गावांतील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी रांगोळी, गायन आणि नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. महिलांनी सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळ्या रेखाटल्या, आणि विजेत्यांना मानचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले.

 

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मलठण गावाच्या सरपंच सौ. माधुरीताई थोरात, सीआरपी शबाना पटेल मॅडम, राणीताई कर्डिले यांनी सहकार्य केले. तसेच, संस्थेचे कार्यकर्ते लीलाधर रोठे, राधाबाई घेगडे, उज्ज्वला ताई इचके, सुप्रिया लंके, असिस्टंट प्रोजेक्ट ऑफिसर रूपाली बोर्डे, आणि प्रोजेक्ट ऑफिसर अमोल राठोड यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल राठोड सरांनी केले.

 

या उपक्रमामुळे महिलांमध्ये कायदेशीर जागरूकता वाढली असून, त्यांच्या हक्क व अधिकारांविषयी जनजागृती घडवण्याचा एक महत्त्वाचा प्रयत्न यशस्वीपणेपार पडला.

 

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें