वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये योगा शिबिर संपन्न

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये योगा शिबिर संपन्न

गुहागर (सुजित सुर्वे) आरोग्य अधिकारी कुंभार साहेब व योगा प्रशिक्षिका अदिती धनावडे यांचा सत्कार संपन्न

वेलदूर नवानगर मराठी या शाळेमध्ये योगा शिबिराचे औचित्य साधून वेलदूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर श्री.कुंभार सर यांचा सत्कार करण्यात आला.तसेच योग प्रशिक्षिका, अदिती धनावडे मॅडम यांचाही सत्कार करण्यात आला.आरोग्यविषयक माहिती विद्यार्थ्यांना डॉक्टर कुंभार सर यांनी दिली.
योग प्रशिक्षिका धनावडे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना विविध योग प्रकार योगासनांचे महत्त्व उत्तम आरोग्य विषयक सवयी सूर्यनमस्काराचे प्रकार व माहिती दिली.
डॉक्टर कुंभार यांचा मुख्याध्यापक मनोज पाटील यांचे हस्ते शाल अमृत महोत्सवी स्मरणिका पुष्पगुच्छ देऊन तसेच योग प्रशिक्षक अदिती धनवडे यांचा शाल पुष्पगुच्छ व स्मरणिका देऊन अंजली मुद्दमवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.शाळेच्या शिक्षिका सुषमा गायकवाड मॅडम,अफसाना मुल्ला मॅडम, ग्रामस्थ सौ खडपकर उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोरे मॅडम यांनी केले.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]