राजापूरमध्ये शिवजयंतीनिमित्त भव्य वाहनफेरी; शहर भगवेमय.

राजापूरमध्ये शिवजयंतीनिमित्त भव्य वाहनफेरी; शहर भगवेमय.

 

✍️राजू सागवेकर/राजापूर

 

▪️राजापूर शहरात शिवस्मृती मंडळाच्या वतीने शिवजयंतीनिमित्त रविवारी (१६ मार्च) भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. या वाहनफेरीत सुमारे पाचशेहून अधिक दुचाकीस्वार सहभागी झाले होते. भगवे ध्वज, फेटे आणि जयघोषाने संपूर्ण शहर शिवमय झाले होते.

 

▪️शहरातील एस.टी. डेपो येथे धर्मध्वज पूजनाने वाहनफेरीची सुरुवात झाली. त्यानंतर कोदवली गुरववाडी, जकात नाका, जवाहर चौक, बाजारपेठ, चिंचबांध, वरची पेठ, राजीव गांधी क्रीडांगण, बंदरधक्का, वैशंपायन पूल, गुजराळी बागकाजी, दिवटेवाडी, साखळकरवाडी आणि पुन्हा जवाहर चौक येथील शिवस्मारक येथे वाहनफेरीचा समारोप झाला.

 

▪️यावेळी शहरातील महिलांचाही मोठा सहभाग पाहायला मिळाला. प्रत्येक दुचाकीवर भगवा ध्वज फडकत होता, तर शिवभक्तांनी परिधान केलेल्या भगव्या फेट्यांनी संपूर्ण शहर शिवमय झाले होते.

 

▪️ शिवस्मृती मंडळातर्फे १६ आणि १७ मार्च या दोन दिवसांमध्ये शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी (१७ मार्च) तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जाणार असून, शिवप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें