शहिद मेजर संदिप उन्नीकृष्णन यांच्या जयंती निमित्त शहर भाजपाच्या वतीने अभिवादन

शहिद मेजर संदिप उन्नीकृष्णन यांच्या जयंती निमित्त शहर भाजपाच्या वतीने अभिवादन

 

शहिद मेजर संदिप उन्नीकृष्णन यांचे बलिदान देश विसरणार नाही -सुनिल सकट

 

अहिल्या नगर ( नंदकुमार बगाडेपाटील): २००८ साली मुंबई मध्ये 26 /11 रोजी झालेल्या दहशतवादी अतिरेकी हल्ल्यात लढुन देशासाठी शहिद झालेले शहिद मेजर संदिप उन्नीकृष्णन यांच्या जयंती निमित्त अहिल्यानगर येथील रामवाडी येथे “भारतीय जनता पार्टी” शहरजिल्हा अनु.जा.मोर्चाच्या वतीने शहीद मेजर उन्नीकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करुन मानवंदना देण्यात आली. यावेळी मोर्चाच्या शहराध्यक्षा मिराताई सरोदे व शहर चिटणीस सुनिल सकट आदींसह महिला भगिनी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मुंबई मध्ये 26 /11/2008 रोजी झालेल्या दहशतवादी अतिरेकी हल्ला झाला.यावेळी अतिरेक्यांशी लढुन देशासाठी शहिद झालेले शहिद मेजर संदिप उन्नीकृष्णन यांना मरणोपरांत “अशोकचक्र” या मानाच्या शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.मेजर उन्नीकृष्णन यांचे बलीदान देशासाठी अजरामर व प्रेरणादायी आहे.त्यांचे बलीदान देश कदापी विसरणार नाही. असे प्रतीपादन सुनिल सकट यांनी केले.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें