आबलोली वरची पागडेवाडी येथे २७ मार्च रोजी ग्रामदेवता आई श्री. नवलाई देवीच्या पालखीचे भक्तगणांच्या भेटीला होणार आगमन

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

आबलोली वरची पागडेवाडी येथे २७ मार्च रोजी ग्रामदेवता आई श्री. नवलाई देवीच्या पालखीचे भक्तगणांच्या भेटीला होणार आगमन

आबलोली वरची पागडेवाडी विकास मंडळ यांचे वतीने पालखी मिरवणूकीसह घोरीपोत्सव, नमनाच्या कार्यक्रमाचे आयोजन

आबलोली (संदेश कदम) 

गुहागर तालुक्यातील आबलोली येथील आबलोली वरची पागडेवाडी येथे आबलोली वरची पागडेवाडी विकास मंडळ(रजि.) सांस्कृतिक कलामंच आयोजित ग्रामदेवता आई श्री. नवलाईदेवीच्या पालखीच्या आगमना (घोरिपोत्सव) निमित्त गुरुवार दिनांक २७ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ०४:०० वाजता प्रतीवर्षी व प्रथेप्रमाणे आबलोली सोनार वाडी येथील श्री. भगवती देवीच्या देवळा मधून आबलोली बाजारपेठेतून आई श्री नवलाईदेवीच्या पालखीची भव्य दिव्य मिरवणूक काढून आबलोली वरची पागडेवाडी येथे आगमन होईल.यावेळी लेझीम ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतिष बाजीत ठिक ठिकाणी पालखीचे जोरदार जंगी स्वागत करण्यात येईल. महिलांच्या वतीने आरती करून औक्षण करण्यात येईल. ग्रामस्थांच्या, भक्तगणांच्या भेटीला आई नवलाईदेवी वाडी – वस्तीवर, घरो – घरी येणार म्हणून आई नवलाईदेवीच्या भक्तगणांच्या आनंदाला उधाण आले आहे.

आबलोली वरची पागडेवाडी विकास मंडळ (रजि.) सांस्कृतिक कलामंच आयोजित आई श्री. नवलाईदेवी पालखीच्या आगमना (घोरीपोत्सवा)निमित्त रात्रौ ठिक १०:०० वाजता कोकणची सांस्कृतिक लोककला बहूरंगी नाट्य नमनाचा कार्यक्रम सादर होईल.आई चरणी आराधना व श्री. गणेशाला वंदन करून नटखट गौळणींसह कौशल्य पूर्ण अतरंगी कलाकारांनी साकारलेला निर्माता, दिग्दर्शक आणि लेखक गोविंद पागडे लिखित “प्रेमासाठी काय पण..!” हे विनोदी फार्स सादर करण्यात येणार आहे या वगनाट्याचे सुत्रधार म्हणून नितिन मोहन पागडे, मृदुंग मणी वादक अंकुश बाबू पागडे, ढोलकी वादक शैलेश पागडे, निर्मिती सहाय्यक, गायक म्हणून नितिन दत्ताराम घाणेकर तसेच मेकअपमण म्हणून आशिष उर्फ पप्पू भोसले हे काम करणार आहेत.तर वाडीतील नमन हौशी कलाकार यामध्ये सहभागी होणार आहेत. तरी आबलोली पंचक्रोशीतील ग्रामस्थ, भक्तगण मंडळींनी पालखी आगमन सोहळ्यात सहभागी होऊन घोरीपोत्सव नमन कार्यक्रमास बहुसंख्येने वेळेत उपस्थित रहावे असे जाहिर आवाहन आबलोली वरची पागडेवाडी विकास मंडळ (रजि.) चे अध्यक्ष. श्री. मधुकर गो. पागडे व कार्यकारी मंडळाच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]