स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा यांच्याविरोधात शिवसैनिकांची तक्रार – राजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा यांच्याविरोधात शिवसैनिकांची तक्रार – राजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी

 

राजापूर:  (प्रशांत पवार)  शिवसेना तालुकाप्रमुख दीपक तुकाराम नागले यांनी स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा यांच्याविरोधात राजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मुंबईतील एका कॉमेडी शोमध्ये उपमुख्यमंत्री व शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाण्याद्वारे आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप कामरा यांच्यावर करण्यात आला आहे.

 

शिवसैनिकांचे भावना दुखावल्या – तक्रारीत उल्लेख

 

तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, कुणाल कामरा यांनी आपल्या कॉमेडी शोमध्ये एका गाण्याच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांच्या व्यक्तिमत्त्वाची बदनामी केली. यामुळे शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या असून त्यांनी कामरा यांच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे.

 

“शिंदे साहेब हे आमच्या शिवसैनिकांचे स्फूर्तीस्थान आहेत. आमच्या नेत्याबाबत कुणीही आक्षेपार्ह विधान करणे आम्ही खपवून घेणार नाही. त्यामुळे कुणाल कामरा यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा,” अशी मागणी दीपक नागले यांनी आपल्या तक्रारीत केली आहे.

 

शिवसेनेचा आक्रमक पवित्रा

 

यापूर्वीही कुणाल कामरा यांनी विविध राजकीय नेत्यांवर टीका केली होती. मात्र, या वेळी त्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याविषयी केलेल्या विधानामुळे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. जर कामरा यांच्यावर कारवाई झाली नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे.

 

पोलिसांची प्रतिक्रिया

 

राजापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांनी सांगितले की, “शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून तक्रार प्राप्त झाली आहे. कायदेशीर सल्ल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.”

कुणाल कामरा यांची प्रतिक्रिया अद्याप नाही

या संपूर्ण प्रकरणावर कुणाल कामरा यांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, काही अहवालांनुसार ते मुंबई सोडून पाँडिचेरीला रवाना झाले आहेत.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]