जिल्हा परिषद मत्स्य शाळा नवापूर पालघर येथे विद्यार्थ्यांना हरेन टेक्स्टाईल कंपनीकडून शैक्षणिक साहित्य दप्तर व खाऊ वाटप

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

जिल्हा परिषद मत्स्य शाळा नवापूर पालघर येथे विद्यार्थ्यांना हरेन टेक्स्टाईल कंपनीकडून शैक्षणिक साहित्य दप्तर व खाऊ वाटप

पालघर – संदीप शेमणकर
पालघर जिल्ह्यातील जि.प. मत्स्यशाळेतील विद्यार्थ्यांना हरेन टेक्साईल कंपनीकडून व मा.उपसभापती मिलिंद वडे सरांच्या,मा .सरपंच अंजली बारी , ग्रा.पं.स. अधिराज पागधरे यांच्या प्रयत्नातून शैक्षणिक साहित्य दप्तर व खाऊ वाटप करण्यात आले. मान्यवरांचे मनस्वी आभार व्यक्त करण्यात आले.कार्यक्रमात हरेन कंपनीची टीम उपस्थित होती .त्यात राकेश महाजन सर जनरल मॅनेजर हरेन टेक्सटाईल ,राजेश नायक सर सीओओ हरेन टेक्सटाईल अकलूज दुबे सर मॅनेजर सीनियर एक्झिक्यूटिव्ह हरेन टेक्सटाईल ,कोमल मॅडम (HR), केणी सर (HR)तसेच ग्रा.पं.स. उन्नती हंबीरे ,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य प्रिया पागधरे , हर्षल वडे व अन्य ग्रामस्थ ,पालक व शिक्षकवृंद उपस्थित होते . सदर कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना शाळेची गोडी निर्माण होईल.असा आशावाद पालकांमध्ये निर्माण झाला . कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शाळेतील शिक्षिका सौ.शितल संखे यांनी केले ‌.विदयार्थांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यासाठी आलेल्या मान्यवरांचे शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षकवृंद व पालकांकडून मनापासून आभार व्यक्त करण्यात आले.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]