माजी सभापती जया माने यांचा आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

माजी सभापती जया माने यांचा आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश

राजापुर – माजी सभापती जया माने यांनी आज सकाळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्व आणि विधानसभा क्षेत्रप्रमुख पदाचा राजीनामा दिल्यानंतर संध्याकाळी आमदार किरण (भैया) सामंत व माजी आमदार राजन साळवी यांच्या उपस्थितीत शिवसेना (शिंदे गट) पक्षात प्रवेश केला.

यावेळी साखरपा विभागातील शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. आपल्या प्रवेशाबाबत बोलताना जया माने म्हणाल्या की, “आमदार किरण सामंत यांच्या कार्यशैलीने प्रेरित होऊन मी शिवसेनेच्या मूळ प्रवाहात सामील होत आहे.”

या प्रवेशावेळी देवडे सरपंच विलास कांगणे, किरबेट-भोवडे सरपंच प्रणिता कांबळे, उपसरपंच सतीश कांबळे, कोंडगाव सरपंच प्रियांका जोयशी, साखरपा सरपंच रुचिता जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार किरण सामंत यांनी जया माने यांच्या पक्षप्रवेशाचे स्वागत करताना मतदारसंघात विकासकामांचा वेग कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. माजी आमदार राजन साळवी, माजी जिल्हा परिषद सदस्य बापू शेट्ये यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या.

प्रमुख उपस्थित मान्यवर:

  • आमदार: किरण सामंत
  • माजी आमदार: राजन साळवी
  • उपजिल्हाप्रमुख: राजेश पत्याणे, राजू कुरूप
  • जिल्हा बँक प्रतिनिधी: श्री. खामकर
  • महिला उपजिल्हाप्रमुख: भाग्यश्री सुर्वे
  • इतर मान्यवर: बापू लोटनकर, बापू शिंदे, संजय सुर्वे, मनोहर सुकम, शुभम गांधी, चंद्रकांत गोसावी आदी

या पक्षप्रवेशामुळे साखरपा विभागात शिंदे गटाला बळकटी मिळाल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]