बनावट भाजप जिल्हाध्यक्षांची यादी सोशल मीडियावर व्हायरल; रवींद्र चव्हाण यांचा इशारा

बनावट भाजप जिल्हाध्यक्षांची यादी सोशल मीडियावर व्हायरल; रवींद्र चव्हाण यांचा इशारा

फक्त ५८ जिल्हाध्यक्षांची अधिकृत घोषणा; बनावट यादी पसरवणाऱ्यांविरोधात पोलिस कारवाई होणार

बातमी …
मुंबई: भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) जिल्हाध्यक्षांची एक बनावट यादी सध्या समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्या यादीचा पक्षाशी काहीही संबंध नाही, असे स्पष्टीकरण भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिले आहे. ‘भाजप जिल्हाध्यक्ष 2025’ या नावाने फिरणाऱ्या या यादीत ८१ नावांचा समावेश असून ती पूर्णतः खोटी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने संघटन पर्व अभियान हाती घेतले आहे. या अभियानांतर्गत सुमारे दीड कोटी सदस्यांची नोंदणी करण्यात आली आहे. याच अभियानाच्या माध्यमातून रवींद्र चव्हाण यांनी महाराष्ट्रभर दौरे करत विविध जिल्ह्यांत पदाधिकाऱ्यांची निवड केली. याअंतर्गत आतापर्यंत फक्त ५८ जिल्हाध्यक्षांची अधिकृत घोषणा करण्यात आली असून उर्वरित जिल्ह्यांची निवड प्रक्रिया सुरू असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.

बनावट यादीमुळे पक्षाची प्रतिमा मलीन होण्याची शक्यता असल्याने, भाजपकडून सायबर क्राईम अंतर्गत पोलीस तक्रार दाखल करण्यात येणार आहे. ही यादी हेतुपुरस्सरपणे पसरवली जात असून ती पूर्णपणे खोटी आहे, असे भाजपने सांगितले. मुंबईत उत्तर मुंबई, उत्तर पूर्व मुंबई आणि उत्तर मध्य मुंबईसाठी अनुक्रमे दीपक तावडे, दीपक दळवी आणि विरेंद्र म्हात्रे यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

“बनावट यादीवर विश्वास ठेवू नका. केवळ अधिकृत माध्यमांतून जाहीर होणाऱ्या माहितीवरच विश्वास ठेवा,” असे आवाहन रवींद्र चव्हाण यांनी पक्ष कार्यकर्ते व प्रसारमाध्यमांना केले आहे.

हॅशटॅग्स:
#BJP #RavindraChavan #FakeListAlert #PoliticalNews #MaharashtraPolitics #भाजप #जिल्हाध्यक्ष #रत्नागिरीवार्ताहर

फोटो 

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें