मंडणगड तालुक्यात ॲम्बुलन्स वेळेवर न मिळाल्याने गर्भवतीचा मृत्यू; बाळासह दुर्दैवी अंत

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

Pregnant Woman Died Ratnagiri:

मंडणगड तालुक्यात ॲम्बुलन्स वेळेवर न मिळाल्याने गर्भवतीचा मृत्यू; बाळासह दुर्दैवी अंत

आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह; दोन चालकांवर कारवाईची शक्यता

 

रत्नागिरी | प्रतिनिधी

रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात आरोग्य यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे एका आठ महिन्यांच्या गर्भवतीचा आणि तिच्या बाळाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 10 मे रोजी कुडूक बुद्रुक गावात ही घटना घडली. वेळीच ॲम्बुलन्स न मिळाल्याने गर्भवती महिला दापोली उपजिल्हा रुग्णालयात पोहोचू शकली नाही आणि रस्त्यातच तिचा व बाळाचा मृत्यू झाला.

 

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, 108 नंबरवर कॉल केल्यानंतर ती ॲम्बुलन्स दुसऱ्या ठिकाणी गेल्याचे सांगण्यात आले. त्याचवेळी 102 रुग्णवाहिका रुग्णालयात उपलब्ध असूनही ती विविध कारणं देत नाकारण्यात आली. अखेर नाईलाजाने खासगी रुग्णवाहिका घेऊन महिला दापोलीकडे रवाना झाली. मात्र, दापोली गाठण्याआधीच गर्भवती महिलेचा मृत्यू झाला.

 

या घटनेनंतर जिल्हा आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली असून, दोन ॲम्बुलन्स चालकांवर कारवाई होणार असल्याची माहिती मिळते. या परिसरात स्त्री रोगतज्ज्ञच उपलब्ध नसल्याची बाबही उघड झाली असून, मंडणगडसारख्या दुर्गम तालुक्यातील आरोग्य यंत्रणेची कार्यपद्धतीच संशयाच्या भोवऱ्यात आली आहे.

 

#RatnagiriNews #Mandangad #PregnantWomanDeath #AmbulanceDelay #HealthSystemFailure #KokanNews #DapoliHospital

 

फोटो

 

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]