नेपाळमध्ये लपून बसलेला निलेश चव्हाण अखेर अटकेत!

???? नेपाळमध्ये लपून बसलेला निलेश चव्हाण अखेर अटकेत!

 

वैष्णवी हगवणे प्रकरणातील मुख्य आरोपीला पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कामगिरी

 

पुणे | प्रतिनिधी – वैष्णवी हगवणे प्रकरणातील फरार आरोपी निलेश चव्हाण याला नेपाळमधून अखेर अटक करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या विशेष पथकाने ही धडाकेबाज कारवाई केली असून, या प्रकरणातील अनेक रहस्यांना आता कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.

 

वैष्णवीचं बाळ निलेशकडेच होतं, आणि बाळ परत मिळवण्यासाठी गेलेल्या कस्पटे कुटुंबाला बंदुकीचा धाक दाखवून धमकावल्याचा गंभीर आरोप त्याच्यावर आहे. या प्रकारानंतर निलेश चव्हाण फरार झाला होता. पोलिसांनी त्याच्याविरोधात स्टँडिंग वॉरंट काढले होते आणि विशेष ६ पथकं त्याच्या मागावर होती.

 

गुप्त माहितीच्या आधारे पथकाने नेपाळमध्ये जाऊन त्याला प्रत्यक्ष अटक केली. तो वैष्णवीची नणंद असलेल्या करिष्मा हगवणे हिचा मित्र असल्याची माहिती समोर आली आहे. वैष्णवीच्या बाळाशी संबंधित प्रकरणात त्याच्यावर गुन्हा दाखल असून, त्याच्या अटकेनंतर या गुंतागुंतीच्या प्रकरणात महत्त्वाचे तपशील उजेडात येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

 

 

 

???? हॅशटॅग्स:

 

#NileshChavan #NepalArrest #VaishnaviHagavaneCase #PimpriChinchwadPolice #BreakingNews #CrimeNews #RatnagiriVartahar

 

 

 

???? फोटो

 

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें