राजापूर पंचायत समितीतील २०१३च्या धनादेश चोरी प्रकरणी न्यायालयाचा निकाल

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 


???? दहा लाखांच्या अपहार प्रकरणात दोघांची निर्दोष मुक्तता!

राजापूर पंचायत समितीतील २०१३च्या धनादेश चोरी प्रकरणी न्यायालयाचा निकाल

राजापूर (प्रतिनिधी) – राजापूर तालुका पंचायत समिती कार्यालयातील शिक्षण विभागात सन २०१३ मध्ये झालेल्या १० लाख रुपयांच्या धनादेश चोरी व अपहार प्रकरणातील दोन्ही आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. राजापूर न्यायालयाचे न्यायाधीश सुरज नलवडे यांनी बुधवारी (२८ मे) हा निकाल जाहीर केला.

या प्रकरणी फिर्याद तत्कालीन गटशिक्षणाधिकारी तानाजी भिकू नाईक यांनी राजापूर पोलीस ठाण्यात दिली होती. गुन्हा वाघू शंकर कोडलकर, संजय दत्ताराम नेवरेकर आणि खुद्द तानाजी नाईक यांच्याविरोधात दाखल करण्यात आला होता. तपास करत पोलीस उपनिरीक्षक विलास सुतार यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

खटल्यादरम्यान अनेक साक्षीदार तपासण्यात आले, मात्र संजय नेवरेकर यांचा खटला सुरू असतानाच मृत्यू झाल्याने उर्वरित दोघांवर खटला चालवण्यात आला. अखेरीस, सरकार पक्ष पुरावे सादर करण्यात अपयशी ठरल्याने न्यायालयाने या दोघांची निर्दोष मुक्तता केली.

या खटल्यात वाघू कोडलकर यांच्यावतीने अॅड. प्रविण सुर्वे आणि अॅड. समीर कुंटे, तर तानाजी नाईक यांच्यावतीने अॅड. यशवंत कावतकर, अॅड. विकास पळसमकर, आणि अॅड. निखिल तेरवणकर यांनी बाजू मांडली.


???? #राजापूर #पंचायतसमिती #न्यायालयनिर्णय #अपहारप्रकरण #RatnagiriNews #कोकणबातम्या #दोषमुक्तता


???? 

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]