आषाढी वारीसाठी राज्य सरकारचे मोठे पाऊल!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

???? आषाढी वारीसाठी राज्य सरकारचे मोठे पाऊल!

 

वारकऱ्यांसाठी समूह विमा, वैद्यकीय सेवा, टोलमध्ये सवलत; शिंदेंकडून दिलासा- योजना जाहीर

 

मुंबई – येत्या आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये समूह विमा संरक्षण, वैद्यकीय सेवा, टोलमाफीत सवलत, रस्त्यांची डागडुजी, तसेच इतर आवश्यक मूलभूत सुविधा देण्यात येणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भातील माहिती दिली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत या निर्णयांना मंजुरी मिळाली.

 

शिंदे यांनी सांगितले की, मुसळधार पावसामुळे वारी मार्गावर कुठेही अडथळे येऊ नयेत म्हणून रस्त्यांची तातडीने दुरुस्ती केली जाईल. वारकऱ्यांसाठी वॉटरप्रूफ तंबू, विजेची सुविधा, शुद्ध पिण्याचे पाणी आणि टोल सवलत दिली जाणार आहे. यासोबतच प्रत्येक जिल्ह्यातून निघणाऱ्या मोठ्या दिंड्यांसाठी सुसज्ज रुग्णवाहिका उपलब्ध केली जाईल.

 

आरोग्य विभागामार्फत भव्य आरोग्य शिबिरे, कार्डीएक रुग्णवाहिका, पंढरपूरात तात्पुरती आयसीयू सुविधा देण्याचे निर्देशही शिंदे यांनी दिले. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांना स्वतः पंढरपूरला जाऊन व्यवस्था पाहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 

गतवर्षी वारीदरम्यान झालेल्या अपघातांमध्ये मृत्यू पावलेल्या वारकऱ्यांना शासन मदत देणार असून, यंदाची वारी “स्वच्छ वारी, निर्मल वारी, हरित वारी” म्हणून पार पाडण्यात येणार आहे. यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे समन्वय साधावा, असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

 

 

 

???? #आषाढीवारी #वारकरीसंप्रदाय #एकनाथशिंदे #पंढरपूर #वारकरीविमा #स्वच्छवारी #DevendraFadnavis #PandharpurWari2025 #महाराष्ट्रशासन

 

 

 

???? फोटो

 

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]