भोपर परिसरात घरफोडीची घटना — 59 हजारांचा मुद्देमाल चोरीस; सार्वजनिक ठिकाणी CCTV लावण्याची मागणी

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

भोपर परिसरात घरफोडीची घटना — 59 हजारांचा मुद्देमाल चोरीस; सार्वजनिक ठिकाणी CCTV लावण्याची मागणी

 

डोंबिवली | प्रतिनिधी :- निलेश रहाटे

 

डोंबिवली पूर्वेतील भोपर परिसरात नुकत्याच घडलेल्या घरफोडीच्या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेत अज्ञात चोरट्यांनी निलेश रहाटे सामाजिक कार्यकर्ता व पत्रकार हयांच्या बंद घराचा दरवाजा तोडून सुमारे 59 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला.

 

पीडित कुटुंब धार्मिक कार्यासाठी गावी गेले असताना ही घटना घडली. दि 3 जून २०२५ ला घराचा दरवाजा उघडलेला व कपाटातील वस्तू अस्ताव्यस्त दिसून आल्या. तात्काळ मानपाडा डोंबिवली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

 

सार्वजनिक सुरक्षेच्या अभावावर पीडिता चे संतापजनक प्रतिक्रिया

 

भोपर परिसरात व डोंबिवलीच्या अनेक भागांमध्ये सार्वजनिक CCTV कॅमेऱ्यांची सोय नसल्याने यामुळे अशा गुन्हेगारी घटनांमध्ये तपास अडचणीचा होतोच व कायद्याच्या दृष्टिकोनातूनही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनी सार्वजनिक ठिकाणी CCTV बसवण्याची जबाबदारी पार पाडली असती तर चोरटे सहज पकडले गेले असते किंवा काही प्रमाणात अश्या प्रकारचे गुन्हावर आळा बसला असता.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]