“प्लास्टिक प्रदूषण संपवू” या घोषवाक्याखाली सागरी जीवन रक्षणाचा संकल्प!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 

???? “प्लास्टिक प्रदूषण संपवू” या घोषवाक्याखाली सागरी जीवन रक्षणाचा संकल्प!

 

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रत्नागिरीत खाडी स्वच्छता व वृक्षारोपण मोहिम

रत्नागिरी, ५ जून | प्रतिनिधी –

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे “प्लास्टिक प्रदूषण संपवू” या थीमनुसार विविध उपक्रम राबवण्यात आले. संयुक्त राष्ट्रांच्या पुढाकाराने जगभर साजरा होणारा हा दिवस यंदा सागरी प्रदूषण, लोकसंख्यावाढ, ग्लोबल वॉर्मिंग आणि वन्यजीव गुन्हेगारी यांसारख्या गंभीर प्रश्नांवर लक्ष केंद्रीत करणारा ठरला.

यावेळी मत्स्य जलशास्त्र विभाग, राष्ट्रीय सेवा योजना आणि मत्स्य महाविद्यालय, शिरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शिरगाव खाडी परिसरात “प्लास्टिक प्रदूषण मुक्ती अभियान” राबवण्यात आले. खाडीतील प्लास्टिक कचरा गोळा करून, खारफुटीच्या झाडांचे रोपण करण्यात आले.

या मोहिमेत आसिफ पागरकर, अनिरुद्ध अडसूळ, संदेश पाटील, भावेश सावंत, सुहास वासावे तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

या वेळी पेठकिल्ला येथील सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राच्या नव्या इमारतीच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. आशिष मोहिते यांच्या उपस्थितीत क्रिसमस ट्री, बदाम आणि शोभिवंत झाडांची लागवड करण्यात आली. नंतर पर्यावरण शपथ घेऊन सर्वांनी पर्यावरण रक्षणाचा संकल्प केला.

या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी कुलगुरू डॉ. संजय भावे, संशोधन संचालक डॉ. पराग हळदणकर आणि आशिष मोहिते यांचे मार्गदर्शन लाभले.

कार्यक्रमात आसिफ पागारकर, हरिष धमगये, नरेंद्र चोगले, सचिन साटम, व्ही. आर. सदावर्ते, रमेश सावर्डेकर, महेश किल्लेकर, मनिश शिंदे, जाई साळवी, सचिन पावसकर, दिनेश कुबल, सुहास कांबळे, सचिन चव्हाण, प्रवीण गायकवाड, तेजस जोशी, योगेश पिलणकर, स्वप्नील आलीम, उल्हास पेडणेकर, प्रशांत पिलणकर यांनी विशेष योगदान दिले.

???? हॅशटॅग्स :

 

#WorldEnvironmentDay2025 #PlasticFreeOcean #RatnagiriNews #EnvironmentAwareness #MangrovePlantation #SagarJeevshastraKendra #KonkanEcology #रत्नागिरीवार्ताहर

 

???? फोटो

 

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]