कुणबी महिला मंडळाच्या अध्यक्षपदी दीपिका आग्रे, सरचिटणीसपदी प्रतीक्षा कालप-निवाते यांची बिनविरोध निवड

कुणबी महिला मंडळाच्या अध्यक्षपदी दीपिका आग्रे, सरचिटणीसपदी प्रतीक्षा कालप-निवाते यांची बिनविरोध निवड!

मुंबई: कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई संलग्न कुणबी महिला मंडळाच्या सन २०२४ ते २०२९ या कालावधीसाठीच्या नवीन महिला कार्यकारणी पदाधिकाऱ्यांची निवड रविवार, १५ जून २०२५ रोजी परळ, मुंबई येथील कुणबी ज्ञाती गृह (वाघे हॉल) येथे मोठ्या उत्साहात पार पडली. संघाध्यक्ष अनिल नवगणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत, सरचिटणीस कृष्णा वणे यांनी निवड प्रक्रियेची सुरुवात केली. यावेळी महिला मंडळाच्या माजी अध्यक्षा सुवर्णा पाटील आणि सेक्रेटरी दीपिका आग्रे उपस्थित होत्या.
नूतन पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड
या महत्त्वपूर्ण निवडीमध्ये मंडळाच्या सेक्रेटरी पदाचा अनुभव असलेल्या सौ. दीपिका संदीप आग्रे (चिपळूण, रत्नागिरी) यांची कुणबी महिला मंडळाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या नेतृत्वाखाली मंडळ सामाजिक कार्यात अधिक सक्रिय होईल अशी अपेक्षा आहे.
तसेच, महत्वाच्या अशा सरचिटणीस पदी सौ. प्रतीक्षा निवाते (तळा) यांची निवड करण्यात आली. त्यांच्यासोबतच खालील प्रमुख पदाधिकाऱ्यांचीही निवड झाली:
उपाध्यक्षा: सौ. सुहासिनी गोणबरे (गुहागर),   सौ. स्मिता गोंधळी (संगमेश्वर),                    सौ. करुणा पाटील (शहापूर),                       सौ. स्नेहा खापरे-म्हसळ.

सहचिटणीस: सौ. स्वप्ना गोरीवले-गुहागर, सौ. संजना भोईर-ठाणे ग्रामीण, सौ. दीपिका मौले-महाड पोलादपूर, सौ. अश्विनी बाईत-विक्रोळी. खजिनदार: रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील कु. निलाक्षी दामोदर लोंढे यांची एकमताने खजिनदार पदी निवड करण्यात आली.
निवड प्रक्रिया आणि उपस्थिती
कोकण विभागातील सात जिल्ह्यांमध्ये १०५ वर्षांपासून कार्यरत असलेल्या या संघटनेतून विविध तालुका तसेच विभागीय शाखांमधून महिला प्रतिनिधी पाठवण्यात आले होते. यातून प्रथम ५१ कार्यकारणी सदस्यांची निवड करण्यात आली, तर उर्वरित महिला सदस्य प्रतिनिधी म्हणून राहतील असे सरचिटणीस कृष्णा वणे यांनी सांगितले. ही संपूर्ण निवड प्रक्रिया अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
यावेळी कुणबी संघाचे उपाध्यक्ष शंकरराव म्हसकर, उदय कटे, सहसचिव माधव कांबळे, संजय उमासरे, रवींद्र कुडतरकर, खजिनदार महेश शिर्के इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
पुढील वाटचाल आणि मंडळाची उद्दिष्ट्ये
नवनिर्वाचित महिला मंडळाने सामाजिक प्रश्न, जनजागृती, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि राजकीयदृष्ट्या महिला सक्षमीकरण यावर भर द्यावा, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. सरचिटणीस कृष्णा वणे यांनी सर्वांचे आभार मानून सभेचा समारोप केला.
ही निवड कुणबी महिला मंडळाच्या कार्याला नवी दिशा देईल आणि समाजाच्या विकासात महिलांचा सहभाग वाढवेल अशी आशा आहे.

#Hashtags:
#कुणबीमहिलामंडळ #दीपिकाआग्रे #प्रतिक्षाकालपनिवाते #कुणबीसमाज #मुंबई #महिलासक्षमीकरण #सामाजिककार्य #रत्नागिरीवार्ताहर #महाराष्ट्र #बिनविरोधनिवड #महिलानेतृत्व #२०२५ #KunbiMahilaMandal #WomenEmpowerment
Source: www.Ratnagirivarthar.in

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें