विकसित महाराष्ट्रासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा – जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

🌟 Developed Maharashtra 2047 Citizen Survey

विकसित महाराष्ट्रासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा – जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

 

रत्नागिरी : राज्य सरकारच्या “विकसित महाराष्ट्र 2047” या महत्त्वाकांक्षी उपक्रमाअंतर्गत दिवस 150 Vision Campaign राबविण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ६ मे ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत Vision Document for Viksit Maharashtra 2047 तयार केला जात आहे. त्याअंतर्गत “विकसित महाराष्ट्र 2047 नागरिक सर्वेक्षण” दिनांक १८ जूनपासून सुरू झाले असून, सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

📌 सर्वेक्षणासाठी लिंक : https://wa.link/o93s9m

या सर्वेक्षणाच्या माध्यमातून नागरिकांचे मत, अपेक्षा, आकांक्षा, अडचणी, तसेच शासनाकडून असलेल्या अपेक्षांची माहिती गोळा केली जात आहे. या माहितीच्या आधारावर भविष्यातील रोडमॅप तयार करून महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास सुनिश्चित केला जाणार आहे.

राज्य शासनाच्या नियोजन विभागातर्फे आणि माहिती व जनसंपर्क विभागाच्या सहकार्याने या राज्यस्तरीय सर्वेक्षण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालय आणि विविध शासकीय विभाग सक्रिय सहभाग घेत आहेत.

🧭 India @2047 संदर्भातील दृष्टिकोन

भारत सरकारने “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” साजरा करताना 2047 पर्यंत India as a Developed Nation करण्याचा संकल्प केला आहे. त्याअंतर्गत महाराष्ट्राने 2047 पर्यंत आपली अर्थव्यवस्था $3.5 ट्रिलियन डॉलर पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. तर 2025-26 पर्यंत $1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था गाठणे हे सरकारचे प्राथमिक ध्येय आहे.

 

 

 

🔖 हॅशटॅग्स :

 

#ViksitMaharashtra2047 #CitizenSurvey #IndiaAt2047 #DevelopedIndia #महाराष्ट्र2047 #EconomicVision #DistrictCollectorAppeal #PublicParticipation #RatnagiriUpdates

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]