सामान्य जनतेवर रोज अन्याय… मग आमदाराला एक दिवस खराब जेवण खपलं नाही का?” – गणेश कदम यांचा सवाल

🛑 MLA Sanjay Gaikwad Suspension Demanded by Activist Ganesh Kadam – Assault Over Canteen Food Sparks Outrage

सामान्य जनतेवर रोज अन्याय… मग आमदाराला एक दिवस खराब जेवण खपलं नाही का?” – गणेश कदम यांचा सवाल

 

📍 आबलोली (संदेश कदम)

मुंबईतील आमदार निवास कँटीनमध्ये झालेल्या मारहाणी प्रकरणावरून सामाजिक कार्यकर्ते गणेश कदम यांनी संतप्त प्रतिक्रिया देत आमदार संजय गायकवाड यांचं निलंबन करण्याची मागणी राज्यपाल राधाकृष्णन यांच्याकडे केली आहे.

 

 

मिळालेल्या माहितीनुसार, अधिवेशनादरम्यान आमदार संजय गायकवाड यांनी ‘खराब जेवण’ मिळाल्याच्या कारणावरून कँटीन कर्मचाऱ्यावर थेट हात उगारला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावर प्रतिक्रिया देताना गणेश कदम म्हणाले, “खराब जेवण मिळालं म्हणून मारहाण करणं हा गुन्हा आहे. अशा कृतीचं समर्थन करता येणार नाही. यावर चर्चा करायची होती तर फूड कमिटी किंवा अधिवेशनामध्ये प्रश्न मांडता आला असता.”

 

गणेश कदम पुढे म्हणाले, “एका दिवसाचं खराब डाळ-भाजी खपली नाही, तर जनतेला वर्षानुवर्षे रस्ते, पाणी, धान्य, औषधे, बी-बियाणे खराब मिळतात, तेव्हा त्यांना काय मारहाणीचा पर्याय आहे का? न्याय्य मार्गाने मुद्दे मांडणे हाच योग्य मार्ग आहे.”

 

“फक्त आमदार निवासच नव्हे, तर अंगणवाडी, शालेय पोषण आहार, जिल्हा रुग्णालय अशा सर्वच ठिकाणी दर्जेदार अन्न मिळणं गरजेचं आहे,” असंही कदम यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं.

 

 

🟣 #MLASuspended #SanjayGaikwadControversy #GaneshKadam #CanteenAssault #MLAAbuseOfPower #PoorFoodNoExcuse #PublicAnger #GovernorAppeal #MarathiNews #जनतेचाQuestions #सामाजिकन्याय #MLAMumbaiBrawl

 

 

–📸 फोटो

✍️ बातमी – रत्नागिरी वार्ताहर

 

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें