आमदार संजय गायकवाड यांच्याकडून कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण: निकृष्ट जेवणावरून ‘दबंगगिरी’चा आरोप!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

आमदार संजय गायकवाड यांच्याकडून कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण: निकृष्ट जेवणावरून ‘दबंगगिरी’चा आरोप!

MLA Sanjay Gaikwad allegedly assaults canteen worker over food quality; Opposition condemns “irresponsible” act.

मुंबई: शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये निकृष्ट दर्जाचे जेवण दिल्याच्या रागातून थेट एका कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सत्ताधारी पक्षाच्या आमदाराकडून झालेल्या या बेजबाबदार वर्तनामुळे राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून, विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे.

काल रात्री (मंगळवारी) घडलेल्या या घटनेत, गायकवाड यांनी कॅन्टीनमध्ये शिळा भात आणि वास येणारी डाळ दिल्याने त्यांचा पारा चढल्याचे सांगितले जात आहे. संतप्त गायकवाड यांनी कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे.

या संपूर्ण प्रकरणावर आपली भूमिका मांडताना आमदार संजय गायकवाड म्हणाले, “मी गेल्या साडेपाच वर्षांपासून मुंबईत येतोय आणि सहसा बाहेर जेवत नाही. काल रात्री ९.३० वाजता मी डाळ, वरण, भात, चपातीची ऑर्डर दिली. पहिला घास खाल्ल्यावरच मला खूप घाणेरडे वाटले, दुसरा घास खाल्ल्यावर तर उलटी झाली. वरणाला खूप भयंकर वास येत होता, जणू काही विषारीच! भातही शिळा होता.”

गायकवाड यांनी पुढे सांगितले की, यापूर्वीही तीन वेळा असे निकृष्ट जेवण आल्याने त्यांनी कॅन्टीन मालकाला समज दिली होती. “निकृष्ट जेवण घेऊन पार्सल गाडीत बसलो आणि सकाळी गावी पोहोचल्यावर खूप अस्वस्थ वाटतं,” असे ते म्हणाले. हा त्रास प्रवासाने नसून जेवणामुळे होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. “हे लोक फक्त आमदारांच्याच जीवाशी खेळत नाहीत, तर अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि शेतकरी जे इथे येतात, त्यांच्या आरोग्याशी खेळत आहेत. कोणाच्या जेवणात सुतळी, तर कोणाच्या जेवणात पाल मिळते. इथे पूर्णपणे मग्रुरीचे काम सुरू आहे. १० दिवसांपूर्वीचा शिळा भात आणि वरण दिले, अशावेळी या लोकांची पूजा करायची का?” असा संतप्त सवाल गायकवाड यांनी विचारला.

या घटनेनंतर सत्ताधारी आमदाराच्या कृतीवर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. लोकप्रतिनिधींनी कायदा हातात घेणे कितपत योग्य आहे, यावर आता चर्चा सुरू झाली आहे.

#SanjayGaikwad #MLA #शिंदेगट #शिवसेना #दबंगगिरी #मारहाण #कँटीन #आमदारनिवास #राजकारण #मुंबई #निकृष्टजेवण #MaharashtraPolitics #Controversy #FoodQuality #MLA

Assault

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]