शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विभागप्रमुख अजय पिंपळे यांच्या प्रयत्नांना यश!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विभागप्रमुख अजय पिंपळे यांच्या प्रयत्नांना यश!

विरारच्या ‘सी’ प्रभाग समिती अधीक्षकांना मिळाले हक्काचे नवीन दालन

विरार (संदीप शेमणकर) – वसई-विरार महानगरपालिकेअंतर्गत कार्यरत असलेल्या नऊ प्रभाग समित्यांपैकी, ‘सी’ प्रभाग समितीच्या अधीक्षकांना अखेर स्वतंत्र दालन मिळाले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जीवदानी रोड विभागप्रमुख अजय पिंपळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे शक्य झाले असून, त्यांनी याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

मागील काही काळापासून ‘सी’ प्रभाग समितीचे अधीक्षक पालिकेतील खुल्या जागेत टेबल-खुर्चीवर बसून कामकाज करत होते. प्रभाग समिती अधीक्षकासारख्या महत्त्वाच्या पदासाठी स्वतंत्र दालन नसणे, ही बाब अजय पिंपळे यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तातडीने पालिकेचे ‘सी’ प्रभाग समितीचे प्रभारी सहाय्यक आयुक्त ग्लीसन गोंसालवीस यांच्याकडे यासंदर्भात निवेदन सादर केले. इतर प्रभाग समित्यांमध्ये अधीक्षकांना स्वतंत्र दालने असताना, ‘सी’ प्रभाग समितीवर हा दुजाभाव का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता.

या निवेदनाची प्रभारी सहाय्यक आयुक्तांनी गंभीर दखल घेतली. त्यांनी तत्काळ अधीक्षक जोसेफ डीकोस्टा यांना स्वतंत्र दालन उपलब्ध करून दिले आहे. आपल्या पाठपुराव्याला यश मिळाल्याने अजय पिंपळे यांनी समाधान व्यक्त केले असून, प्रभारी सहाय्यक आयुक्त ग्लीसन गोंसालवीस यांचे आभार मानले आहेत. यामुळे प्रशासकीय कामकाजात अधिक सुसूत्रता येण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

 

 

 

#Vvcmc #VirarNews #ShivSenaUBT #AjayPimple #VasaiVirar #प्रभागसमिती #Development #CitizenPower #LocalNews #मराठीबातम्या #Palika #अधिकार #GoodGovernance #PublicS

ervice

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]