लोकनेते शामराव पेजे महाविद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी: विद्यार्थी आणि शिक्षकांचा सहभाग

लोकनेते शामराव पेजे महाविद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी: विद्यार्थी आणि शिक्षकांचा सहभाग

लहान वयातच गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व रुजवले

रत्नागिरी: रत्नागिरी येथील श्रमिक किसान सेवा समिती संचालित लोकनेते शामरावजी पेजे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, शिवार आंबेरे येथे “राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि सांस्कृतिक विभाग” यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुपौर्णिमा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे श्रमिक विद्यालय येथील विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्यात आले होते, जेणेकरून लहान वयातच त्यांच्या मनात गुरुंप्रति आदर आणि सन्मानाची भावना निर्माण होईल. गुरु-शिष्याचे नाते हे जीवनातील एक अनमोल वळण देणारे नाते आहे, याचे बाळकडू या वयातच त्यांना मिळावे हा यामागचा मुख्य उद्देश होता.

कार्यक्रमादरम्यान, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी गुरुंप्रति आपला आदर आणि सन्मान व्यक्त करत अनेक उदाहरणे दिली आणि आपली मनोगते सादर केली. महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक ओंकार लिंगायत यांनी आपल्या भाषणात आदिकळापासून गुरु-शिष्याचे नाते किती महत्त्वाचे आहे आणि गुरुचे स्थान विद्यार्थी जीवनात कसे दिशादर्शक असते, हे पटवून दिले. त्यांनी इतिहासातील अनेक आदर्श गुरु-शिष्यांची उदाहरणे विद्यार्थ्यांसमोर मांडली.

या कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्राध्यापक अमोल गिरकर, संस्थेचे सहसचिव अविनाश डोर्लेकर, आणि महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रमोद वारीक यांनीही आपल्या मनोगतात मानवी जीवनात गुरुचे स्थान किती उच्च आहे, हे स्पष्ट केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक कु. साहिल कदम आणि कु. सोनाली चौगुले यांनी केले, तर आभारप्रदर्शन कु. आकांक्षा कुळ्ये हिने केले. कु. प्रणय लाखण याने उपस्थितांचे स्वागत केले. हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि आनंदात पार पडला.

#गुरुपौर्णिमा #LokneteShamraoPejeMahavidyalaya #शिक्षणाचाउत्सव #गुरुशिष्यपरंपरा #रत्नागिरी #शिक्षणसंस्कार #राष्ट्रीयसेवायेोजना #सांस्कृतिककार्यक्रम #श्रमिककिसानसेवा

_समिती

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

राहुल गांधींकडून उपोषण सोडवण्यासाठी प्रतिसादच मिळाला नाही; सोनम वांगचुक यांचा मोठा दावा २६ दिवसांच्या उपोषणानंतर वांगचुक यांचा खुलासा; काँग्रेसकडून ट्रोलिंगचा आरोप, सरकारशी ‘मिडनाईट डील’ झाल्याचेही फेटाळले

Horoscope

Weather

और पढ़ें

राहुल गांधींकडून उपोषण सोडवण्यासाठी प्रतिसादच मिळाला नाही; सोनम वांगचुक यांचा मोठा दावा २६ दिवसांच्या उपोषणानंतर वांगचुक यांचा खुलासा; काँग्रेसकडून ट्रोलिंगचा आरोप, सरकारशी ‘मिडनाईट डील’ झाल्याचेही फेटाळले

राज्य

शहर चुनें