आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू दीपा मराठे अंजनवेल विद्यालयात; भव्य स्वागताची तयारी!

आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू दीपा मराठे अंजनवेल विद्यालयात; भव्य स्वागताची तयारी!

तळवली (मंगेश जाधव वेळबंकर)

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील भारतीय महिला संघाच्या माजी खेळाडू आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या सौ. दीपा मराठे २५ जुलै रोजी गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथील दुर्गाबाई हरी वैद्य माध्यमिक विद्यालय आणि भगिरथीबाई सुदाम पाटील ज्युनियर कॉलेजमध्ये (अंजनवेल विद्यालय) उपस्थित राहणार आहेत. डॉ. तात्यासाहेब नातू स्मृतिदिन कार्यक्रमासाठी त्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांशी संवाद साधतील.

दीपा मराठे या १९९० च्या दशकात भारतीय महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व केलेल्या प्रतिभावान अष्टपैलू क्रिकेटपटू आहेत. त्यांना महाराष्ट्र शासनाने शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित केले आहे.

गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथे प्रथमच एका आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटूचे आगमन होत असल्यामुळे, अंजनवेल विद्यालयाकडून त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. दीपा मराठे यांना तिरंगी ध्वज लावून सलामी दिली जाईल, तसेच झांज पथक आणि लेझिम पथकाच्या गजरात भव्य स्वागत रॅली काढण्यात येणार आहे. यानंतर, सहप्रवास प्रतिष्ठानचे विश्वस्त महेश आठल्ये दीपा मराठे यांची विशेष मुलाखत घेणार आहेत.

 

 

#DeepaMarathe #AnjanvelSchool #CricketStar #WomensCricket #ShivChhatrapatiAward #MarathiNews #Guhagar #KokanchaAbhiman #SportsNews #दीपामराठे #अंजनवेलविद्यालय #महिलाक्रिकेट #शिवछत्रपतीपुरस्कार #मराठीबातम्या #क्रीडाबा

तम्या

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें