उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार शेखर निकम यांच्या संकल्पनेतून वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार शेखर निकम यांच्या संकल्पनेतून वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न!

आबलोली (संदेश कदम)

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखरजी निकम यांच्या संकल्पनेतून शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय, खरवते-दहिवली येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अजितदादांचा वाढदिवस एका विधायक उपक्रमाने साजरा करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात आला.

आमदार शेखरजी निकम यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. त्यांच्या प्रेरणेने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्साहात वृक्षारोपण केले. यावेळी आमदार शेखर निकम यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाला बोईसर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजेश पाटील आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनितकुमार पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांसह विद्यार्थ्यांनी फळे, फुले आणि शोभिवंत झाडांची रोपे लावली. महाविद्यालयातील विषयतज्ज्ञांनी रोपण केलेल्या झाडांचे फायदे, लागवड पद्धती आणि नर्सरी व्यवस्थापन याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#AjitPawarBirthday #ShekharNikam #TreePlantation #SharadchandraPawarAgricultureCollege #Chiplun #Sangameshwar #MaharashtraPolitics #पर्यावरणपूरक #वृक्षारोपण #अजितदादापवार #शेखरनिकम #मराठीबातम्या #EnvironmentFri

endly

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]