चेस बॉक्सिंगमधील सुवर्णकन्या माधवी गोणबरेचा आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते गौरव!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

चेस बॉक्सिंगमधील सुवर्णकन्या माधवी गोणबरेचा आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते गौरव!

आबलोली (संदेश कदम)

जागतिक चेस बॉक्सिंग स्पर्धेत भारतासाठी अनेक सुवर्णपदके पटकावणारी, मुंबई-अंधेरी येथे सध्या वास्तव्यास असलेली आणि गुहागर तालुक्यातील खोडदे-गोणबरे वाडीची सुकन्या कु. माधवी रामचंद्र गोणबरे हिचा आमदार भास्करशेठ जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पंचायत समितीचे माजी सदस्य रवींद्र आंबेकर यांची भाची असलेल्या माधवीने तिच्या चमकदार कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

माधवी गोणबरे हिने जागतिक चेस बॉक्सिंग स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. तिने २०१७ मध्ये सुवर्णपदक, २०१८ मध्ये सुवर्णपदक, २०१९ मध्ये रौप्यपदक, २०२२ मध्ये सुवर्णपदक, २०२३ मध्ये रौप्यपदक आणि २०२४ मध्ये सुवर्णपदक जिंकून भारताचा गौरव वाढवला आहे.

तिच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने गुहागर विधानसभा मतदारसंघासाठी आयोजित लोकनेते भास्कर जाधव गुणगौरव सोहळा व मार्गदर्शन शिबिर उत्साहात पार पडले. मुंबई-विरार येथील सखुबाई भास्कर मंगल कार्यालय, मनवेलपाडा, विरार (पूर्व) येथे झालेल्या या सोहळ्यात गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भास्करशेठ जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत माधवी गोणबरेचा जाहीर सत्कार करून गौरव करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर आमदार भास्करशेठ जाधव यांच्यासोबत शिवविद्या प्रबोधिनी बाळासाहेब ठाकरे आयएएस अकॅडमीचे विजय कदम, आय. बी. एस. सी. अकॅडमीचे संचालक आणि उपनेते प्रशांत राणे, विधानसभा क्षेत्र प्रमुख पंकज देशमुख, विरार शहर प्रमुख उदय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

#MadhaviGonbare #ChessBoxingChampion #BhaskarJadhav #Guhagar #Khorode #SportsStar #UddhavBalasahebThackeray #MaharashtraSports #Honor #माधवीगोणबरे #चेसबॉक्सिंग #भास्करजाधव #गुहागर #क्रीडा_बातम्या #

सन्मान

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]