जुनी नंबरप्लेट असलेल्या वाहनधारकांसाठी दिलासा – ‘एचएसआरपी’साठी चौथ्यांदा मुदतवाढ

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 

🚗 जुनी नंबरप्लेट असलेल्या वाहनधारकांसाठी दिलासा – ‘एचएसआरपी’साठी चौथ्यांदा मुदतवाढ 🚗

 

आता अंतिम मुदत ३० नोव्हेंबर २०२५; त्यानंतर ‘एचएसआरपी’ नसल्यास १ डिसेंबरपासून वायुवेग पथकाची कारवाई

 

मुंबई – जुन्या वाहनांवर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) बसवण्यासाठी शासनाने चौथ्यांदा मुदतवाढ देत अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०२५ निश्चित केली आहे. त्यानंतरही वाहनांवर एचएसआरपी बसवले नसेल तर १ डिसेंबरपासून वायुवेग पथकाद्वारे थेट कायदेशीर कारवाई होणार आहे, असा इशारा परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी दिला आहे.

१ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या राज्यातील सर्व वाहनांना एचएसआरपी लावणे बंधनकारक आहे. १ जानेवारी २०२५ पासून ही मोहीम सुरू झाली असून आतापर्यंत तीनदा मुदतवाढ दिल्यानंतर, १५ ऑगस्ट २०२५ ही अंतिम तारीख होती. मात्र अपॉइंटमेंट मिळण्यात होणारा विलंब, ग्रामीण भागातील फिटमेंट केंद्रांचा अभाव, काही केंद्रे बंद असणे आणि लोकप्रतिनिधींसह जनतेच्या मागणीनंतर ही चौथी मुदतवाढ देण्यात आली.

राज्यात ८० टक्के वाहनांवर अजूनही जुनी नंबर प्लेट

राज्यातील २ कोटी वाहनांपैकी तब्बल ८० टक्के वाहनांवर अजूनही जुन्या नंबर प्लेट आहेत. त्यामुळे दंडाची भीती असलेल्या वाहनधारकांना आता मोठा दिलासा मिळाला आहे.

मुदतवाढ असूनही निर्बंध कायम

एचएसआरपी नसलेल्या वाहनांवर वाहन हस्तांतरण, कर्जबोजा नोंदवणे किंवा उतरवणे, पुर्ननोंदणी, वाहन बदल, परवाना नूतनीकरण (योग्यता प्रमाणपत्र वगळता) यांसारखी कामे थांबवण्यात आली आहेत.

१ डिसेंबरपासून कारवाईचे स्वरूप

एचएसआरपी नसलेली वाहने वायुवेग पथक जप्त करेल

बसवून झाल्याशिवाय वाहने सोडली जाणार नाहीत

३० नोव्हेंबरपूर्वी अपॉइंटमेंट असलेल्या वाहनधारकांवर कारवाई होणार नाही

 

तक्रारींसाठी – dytccomp.tpt-mh@gov.in या ईमेलवर संपर्क साधावा.

 

हॅशटॅग :

#एचएसआरपी #HSRP #मुदतवाढ #वाहननंबरप्लेट #वाहनधारक #TransportDepartment #MaharashtraNews #VehicleNews

 

फोटो

 

 

 

 

 

 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]