रत्नागिरीतून लाडक्या देवाभाऊंना तब्बल एक लाख राख्या….

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 

🌸 रत्नागिरीतून लाडक्या देवाभाऊंना तब्बल एक लाख राख्या 🌸

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याचा गौरव; महिला मोर्चाचा अनोखा उपक्रम, मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत राख्यांचे संकलन सुपूर्त…

रत्नागिरी – माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेसह विविध विकास योजनांच्या माध्यमातून राज्यातील महिला, युवक आणि तळागाळातील जनतेसाठी महत्त्वपूर्ण कामे केली आहेत. या कार्याचा गौरव करण्यासाठी आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रत्नागिरीतून लाडक्या बहिणींनी देवाभाऊंना राखी पाठवण्याचा विशेष कार्यक्रम आज पार पडला.

 

या कार्यक्रमास मंत्री नितेश राणे उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी, “रत्नागिरी जिल्ह्यातील लाडक्या बहिणींचा हा स्नेह आणि प्रेम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचवला जाईल,” असे आश्वासन दिले.

 

रत्नागिरी शहर, तालुका, चिपळूण, संगमेश्वर, लांजा आणि राजापूर येथून संकलित झालेल्या तब्बल एक लाखांहून अधिक राख्या महिला मोर्चाच्या प्रतिनिधींनी नितेश राणे यांच्याकडे सुपूर्त केल्या. या सर्व राख्या लाडक्या बहिणींच्या लाडक्या देवाभाऊंकडे सुपूर्त करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.

 

कार्यक्रमाला प्रदेश महिला मोर्चा प्रतिनिधी व संकलन प्रमुख शिल्पा मराठे, जिल्हा अध्यक्ष राजेश सावंत, दक्षिण भाजप महिला मोर्चा अध्यक्षा वर्षा ढेकणे, रत्नागिरी शहराध्यक्ष दादा ढेकणे यांच्यासह मोठ्या संख्येने तालुका पदाधिकारी, कार्यकर्ते आणि लाडक्या बहिणी उपस्थित होत्या.

 

 

हॅशटॅग :

#लाडकीबहीण #रक्षाबंधन #देवाभाऊ #रत्नागिरी #भाजपमहिला_मोर्चा #DevendraFadnavis #BJP #NiteshRane #RatnagiriNews

 

फोटो

 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]