जि. प. प्राथमिक शाळा करेल येथे ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

जि. प. प्राथमिक शाळा करेल येथे ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

✍️ राजू सागवेकर | राजापूर

भारतीय स्वातंत्र्याचा ७९ वा स्वातंत्र्य दिन जि. प. प्राथमिक शाळा, करेल येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. करेल गावच्या पोलीस पाटील सौ. श्रुती सागवेकर यांच्या हस्ते सकाळी ८.३० वाजता तिरंगा ध्वज फडकवून ध्वजारोहण करण्यात आले.

 

भर पावसातही विद्यार्थ्यांनी “भारत माता की जय” घोषणांनी परिसर दुमदुमवला. ध्वजगीत, स्वागतगीत आणि ईश्वरस्मरण गीतांनी वातावरण भारावून गेले.

 

यानंतर शाळेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात उपस्थितांचे स्वागत शिक्षक श्री. वसावे यांनी केले. विद्यार्थ्यांनी दमदार देशभक्तीपर भाषणे सादर केली. सूत्रसंचालन वसावे सरांनीच केले. शेवटी त्यांनी मनोगत व्यक्त करून आभार प्रदर्शन केले.

 

या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरज आंबेलकर, पोलीस पाटील सौ. श्रुती सागवेकर, ज्येष्ठ नागरिक प्रभाकर आंबेलकर, काशिनाथ बाणे, वसंत मोंडे, गावप्रमुख सुरेश आंबेलकर,राजू सागवेकर, दीपक सोडये, संदेश आंबेलकर, अनुज आंबेलकर, पालक दक्षता दसुरी, श्रद्धा नाचणेकर, समीक्षा मिरगुळे, अश्विनी बाणे, माजी विद्यार्थिनी मानसी नाचणेकर, अनुजा सोडये, अंगणवाडी सेविका शर्मिला नाचणेकर, मदतनीस रेश्मा आंबेलकर, रिद्धी सोडये तसेच गावातील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

भारतीय तिरंग्याला मानवंदना देत कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें