“तिसरी मुंबई दुबईपेक्षाही भव्य; बांधकाम उद्योगाने पुढाकार घ्यावा” – मुख्यमंत्री फडणवीस

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 “तिसरी मुंबई दुबईपेक्षाही भव्य; बांधकाम उद्योगाने पुढाकार घ्यावा” – मुख्यमंत्री फडणवीस

👉 नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात उभारणार इनोव्हेशन हब व एज्यु सिटी; परदेशी विद्यापीठांच्या कॅम्पसेसमुळे निर्माण होणार नवे आर्थिक केंद्र

 

मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात तिसरी मुंबई उभी राहत असून ती दुबईपेक्षाही भव्य आणि आधुनिक असू शकते, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. बांधकाम उद्योगाने नवतंत्रज्ञान, जागतिक गुंतवणूक आणि नवनवीन कल्पनांचा वापर करून पुढाकार घेतल्यास हे स्वप्न साकार होईल आणि राज्य सरकार याकामी पूर्ण सहकार्य करेल, असे आश्वासन त्यांनी दिले.

क्रेडाई-एमसीएचआयचे अध्यक्ष म्हणून सुखराज नाहर यांनी गुरुवारी कार्यभार स्वीकारला. यावेळी झालेल्या पदभार सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित होते. या कार्यक्रमाला क्रेडाईचे माजी अध्यक्ष डॉमिनिक रोमल, सचिव ऋषी मेहता, माजी सचिव धवल अजमेरा, सीईओ केवल वलांभिया यांसह बांधकाम उद्योगातील मान्यवर उपस्थित होते.

 

मुख्यमंत्री म्हणाले की, अटल सेतूमुळे तिसऱ्या मुंबईचे दरवाजे उघडले आहेत. या नव्या शहरात 300 एकरवर एज्यु सिटी उभारण्यात येणार असून जागतिक स्तरावरील 12 विद्यापीठांचे कॅम्पस येथे सुरू होणार आहेत. यामुळे एक लाख निवासी विद्यार्थी येथे राहतील आणि या भागात प्रचंड आर्थिक व सामाजिक चैतन्य निर्माण होईल.

 

तसेच, जगभरातील अत्याधुनिक बांधकाम तंत्रज्ञान मुंबईत आणण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. फक्त 120 दिवसांत 80 मजली इमारत उभारण्याचे तंत्रज्ञान आज उपलब्ध आहे आणि अशा प्रकारचे तंत्रज्ञान मुंबईत यायला हवे, असे मत त्यांनी मांडले.

 

मुख्यमंत्री फडणवीस यांनी बी.डी.डी. चाळ पुनर्विकासाचा पहिला टप्पा लोकांना सुपूर्द झाल्याचे सांगत झोपडपट्टी पुनर्विकास हा मुंबईसाठी मोठा बदल घडवू शकणारा प्रकल्प असल्याचे स्पष्ट केले. मुंबई झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी जलद गतीने पुनर्वसनाच्या इमारती उभारणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

 

दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी घरांच्या दरावरूनही खंत व्यक्त केली. राज्य सरकारने दिलेल्या सवलती, प्रीमियम कमी करण्याचे निर्णय, कोस्टल रोड आणि अटल सेतू यांसारखे प्रकल्प असूनही घरांच्या किमती कमी झाल्या नाहीत, उलट वाढल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे परवडणाऱ्या घरांसाठी नवे मार्ग शोधावे लागतील, असे ते म्हणाले.

 

 

 

हॅशटॅग्स :

#तिसरीमुंबई #DevendraFadnavis #MumbaiDevelopment #EducationCity #CREDAI #NaviMumbaiAirport #AffordableHousing #SlumFreeMumbai #Infrastructure

 

फोटो

 

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]