तवसाळ पंचक्रोशीतील दहीहंडी उत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद; “नो सेलेब्रिटी, आपलाच गोविंदा सेलेब्रिटी”

तवसाळ पंचक्रोशीतील दहीहंडी उत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद; “नो सेलेब्रिटी, आपलाच गोविंदा सेलेब्रिटी”

तवसाळ, तवसाळ आगर, पडवे, तांबडवाडी-बाबरवाडी येथे पारंपरिक थरांनी सजला दहीहंडी सोहळा

बातमी ~ प्रीतम सुर्वे, तवसाळ:

तवसाळ पंचक्रोशीतील तवसाळ, तवसाळ आगर, पडवे, तांबडवाडी व बाबरवाडी येथे दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात व आनंदमय वातावरणात साजरा झाला. जिकडे तिकडे “गोविंदा आला रे!”च्या जयघोषात गोविंदा पथकांनी कौशल्याची कसोटी लावत थर रचले.

बाबरवाडी, तांबडवाडी व तवसाळ आगर येथील स्थानिक गोविंदा पथकांनी चार थर रचून उपस्थितांना थरारक क्षणांचा आनंद दिला. तर पडवे गावातील गोविंदा पथकाने शिस्तबद्ध पद्धतीने तीन थरांची दहीहंडी फोडत जन्माष्टमी महोत्सव संस्मरणीय केला.

दरम्यान, तवसाळ गावच्या गोविंदा पथकाने तीन थर रचून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कोणतेही नामवंत कलाकार किंवा पाहुणे नसतानाही “नो सेलेब्रिटी, आपलाच गोविंदा सेलेब्रिटी” असा नारा या उत्सवाला लाभला. “माझ्या डोईवर भरली घागर रे…” या गाण्याच्या ठेक्यावर थिरकणाऱ्या तवसाळ गावच्या गोविंदांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले.

या दहीहंडी सोहळ्यामुळे पंचक्रोशीतील तरुणाईचा उत्साह, शिस्तबद्धता आणि पारंपरिक पद्धतीचे दर्शन घडले.

 

हॅशटॅग्स :

 

#तवसाळदहीहंडी #गोविंदा #जन्माष्टमी२०२५ #रत्नागिरीवार्ताहर #पंचक्रोशीउत्सव

 

 

 

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें