जिल्ह्यातील ९ पंचायत समित्यांच्या सभापती पदांचे आरक्षण जाहीर

📰 जिल्ह्यातील ९ पंचायत समित्यांच्या सभापती पदांचे आरक्षण जाहीर

दापोली – मागासवर्ग, राजापूर – मागासवर्ग महिला, चिपळूण-गुहागर-रत्नागिरी – सर्वसाधारण, मंडणगड-संगमेश्वर-लांजा-खेड – सर्वसाधारण महिला

रत्नागिरी 🙁जिमाका)

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज जिल्ह्यातील नऊ पंचायत समित्यांच्या सभापती पदांच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली. अनन्या अक्षय उकीरडे यांच्या हस्ते ही सोडत पार पडली.

या सोडतीत दापोलीसाठी नागरिकांचा मागासवर्ग, राजापूरसाठी मागासवर्ग महिला, तर चिपळूण, गुहागर आणि रत्नागिरीसाठी सर्वसाधारण असा निकाल लागला. मंडणगड, संगमेश्वर, लांजा आणि खेड या तालुक्यांसाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गाचे आरक्षण निश्चित झाले.

या बैठकीला जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तहसीलदार सर्वसाधारण मीनल दळवी उपस्थित होते. निवासी उपजिल्हाधिकारी श्री. सूर्यवंशी यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे प्रारंभी माहिती दिली. त्यानंतर अनन्या उकीरडे यांच्या हस्ते आरक्षणाच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या.

 

 


✅ हॅशटॅग्स:
#Ratnagiri #PanchayatSamiti #Reservation #GramPanchayat #MaharashtraPolitics

📸

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें