मुंबई विद्यापीठ अंतर्गत 58 व्या युवा महोत्सवाच्या वादविवाद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पेजे महाविद्यालयाला उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त

मुंबई विद्यापीठ अंतर्गत 58 व्या युवा महोत्सवाच्या वादविवाद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पेजे महाविद्यालयाला उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त

रत्नागिरी – संदीप शेमणकर

“प्रेरणा ही नेहमीच प्रेरक ठरते.” याच विचारांतून विद्यार्थीवर्ग घडला पाहिजे असे नि:स्वार्थी विचार मांडणारे निसर्गवासी नंदकुमार मोहिते सर यांनाच प्रेरित होऊन लोकनेते शामरावजी पेजे वरिष्ठ महाविद्यालय शिवार आंबेरे येथील “कु.सानिका सुरेंद्र पोतकर” आणि “कु.सोनाली संतोष चौगुले” यांनी ५८ व्या युवा महोत्सवातील वादविवाद स्पर्धेच्या अंतिम फेरीत “उत्तेजनार्थ क्रमांक” पटकावून आपला ठसा उमटवला. आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थी बोलके आणि क्रियाशील बनले पाहिजेत तसेच संवादी बनले पाहिजे असे सखोल मत , नेहमीच अपार प्रोत्साहन आणि पोषक वातावरण निर्माण करणारे निसर्गवासी मोहिते साहेब.यांच्या स्वप्नांना आणि कष्टांना खऱ्या अर्थाने या दोन विद्यार्थ्यांनी स्पर्धेत विजयी पताका रोवून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली असं म्हटल्यास वावगे ठरणार नाही. या स्पर्धेत “प्रा.अमित पवार” यांनी स्पर्धेचे लेखन- दिग्दर्शन करून अनुभवशील ,प्रभावी तसेच सकस मार्गदर्शन केले. प्र.प्राचार्य प्रमोद वारीक सर हे नेहमीच विद्यार्थ्यांना पाठिंबा देत आहेत.कला विभाग प्रमुख प्रा.कल्पना मेस्त्री मॅडम यांनीदेखील प्रोत्साहन दिले. तसेच सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.ओंकार लिंगायत सर हे आपल्या विद्यार्थ्यांसाठी कार्यतत्पर राहून काम करीत आहेत.एकंदरीत महाविद्यालयातील प्रत्येक घटक निसर्गवासी मोहिते साहेब यांच्या स्वप्नांना आणि प्रेरणाना डोळ्यासमोर ठेवून सजक राहून काम करीत आहेत.या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत खऱ्या अर्थाने या दोन्ही विद्यार्थींनी मोहिते सरांचे विचार कृतीत उतरवले आहेत.
स्पर्धेतील विजयी विद्यार्थी आणि त्यांचे मार्गदर्शक यांवर संस्थेतील पदाधिकारी, प्रभारी प्राचार्य आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकवृंद अशा सर्वच स्तरावरून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें