गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचा बॅडमिंटनमध्ये सुवर्ण हॅट्रिक विक्रम

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 


🏸 गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचा बॅडमिंटनमध्ये सुवर्ण हॅट्रिक विक्रम

मुंबई विद्यापीठ कोकण विभागीय स्पर्धेत पुरुष व महिला संघांचे सलग तिसऱ्या वर्षी विजेतेपद

रत्नागिरी : गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाने (स्वायत्त) बॅडमिंटनमध्ये आणखी एक सुवर्ण कामगिरी करत ऐतिहासिक हॅट्रिक साधली आहे. मुंबई विद्यापीठ अंतर्गत कोकण विभागातील पुरुष व महिला बॅडमिंटन स्पर्धेत सलग तिसऱ्या वर्षी विजेतेपद पटकावून गोगटे-जोगळेकर कॉलेजने आपले वर्चस्व ठामपणे सिद्ध केले.

२९ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२५ दरम्यान एस.आर.एम. कॉलेज, कुडाळ येथे या स्पर्धा पार पडल्या. पुरुष संघात सिद्धेश फणसेकर, अथर्व खेडेकर, आदित्य शिर्के, अथर्व कवितके, मिहिर वाघाटे, शर्विल संसारे आणि शौनक भावे यांनी दमदार खेळ केला. महिला संघात श्रुती फणसे, रिया मोरे, चार्वी कापडी, अपेक्षा राठोड, तन्वी घाणेकर, शर्वरी शिंदे आणि शृजेश्र्वरी आवळकर यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली.

मुंबई विद्यापीठाच्या राज्य संघ निवड चाचणीसाठी सिद्धेश फणसेकर, अथर्व खेडेकर, आदित्य शिर्के व श्रुती फणसे यांची निवड झाली आहे.

या विजयी संघांना क्रीडा संचालक डॉ. विनोद शिंदे, क्रीडा शिक्षक कल्पेश बोटके व माधव फणसे यांचे मार्गदर्शन लाभले. विजयानंतर रा. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह सतीशजी शेवडे, जिमखाना समिती अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर, संस्थेचे संचालक, सदस्य, प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, उपप्राचार्य डॉ. विवेक भिडे, सर्व प्राध्यापक व कर्मचारी यांनी खेळाडूंना अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 

 

 


📌 हॅशटॅग

#रत्नागिरी #बॅडमिंटन #गोगटेजोगळेकरकॉलेज #मुंबईविद्यापीठ #SportsNews #BadmintonChampionship


📸

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]