माध्यमिक विद्यालय वरवडे भागशाळा व श्रीमती पार्वती शंकर बापट कनिष्ठ महाविद्यालय, वाटद–खंडाळा येथे नूतन विज्ञान प्रयोगशाळेचा उद्घाटन समारंभ संपन्न

माध्यमिक विद्यालय वरवडे भागशाळा व श्रीमती पार्वती शंकर बापट कनिष्ठ महाविद्यालय, वाटद–खंडाळा येथे नूतन विज्ञान प्रयोगशाळेचा उद्घाटन समारंभ संपन्न

 

रत्नागिरी:- निलेश रहाटे

 

दि. २६ जानेवारी २०२६

वरवडे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, वरवडे संचलित माध्यमिक विद्यालय वरवडे भागशाळा व श्रीमती पार्वती शंकर बापट कनिष्ठ महाविद्यालय, वाटद–खंडाळा येथे प्रजासत्ताक दिनाच्या शुभ मुहूर्तावर नूतन, सुसज्ज व अत्याधुनिक विज्ञान प्रयोगशाळेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले.

संस्थेचे मुख्य आश्रयदाते मा. श्रीकांत शंकर बापट (चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर, इंडिया अ‍ॅनालिटिकल इन्स्ट्रुमेंट्स प्रा. लि., ठाणे) यांनी दिलेल्या ₹ ४५,८६,०००/- इतक्या भरीव देणगीतून ही अत्याधुनिक विज्ञान प्रयोगशाळा साकारण्यात आली आहे.

या विज्ञान प्रयोगशाळेचे उद्घाटन मा. श्री श्रीकांत शंकर बापट यांचे थोरले बंधू मा.श्री.श्रीराम शंकर बापट गुरुजी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.संस्थेच्या वतीने बापट गुरुजी यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व मानपत्र देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.यावेळी बोलताना श्रीराम बापट गुरुजी यांनी ग्रामीण भागात शिक्षण घेताना आपल्या लहानपणी आलेल्या अडचणी व संघर्ष यांची भावनिक आठवण करून दिली. संस्थेची शाळा सुरू झाल्यानंतर ग्रामीण विद्यार्थ्यांचा शिक्षणातील संघर्ष कसा थांबला, याबाबत त्यांनी आपले मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.

या उद्घाटन समारंभास संस्थेचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र विचारे, माजी अध्यक्ष श्री.सुभाषराव विचारे, सचिव श्री.समीर बोरकर, सहकार्यवाह श्री. संदीप सुर्वे, संचालक श्री. अनिकेत सुर्वे व श्री. तुषार चव्हाण, संस्थेचे माजी संचालक, माजी मुख्याध्यापक,पंचक्रोशीतील बहुसंख्य पालकवर्ग, ग्रामस्थ तसेच इतर अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. प्रभाकर धोपट व सर्व शिक्षकांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही श्री.प्रभाकर धोपट यांनी अत्यंत प्रभावीपणे पार पाडले.

हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संस्थाचालक, शाळेचे मुख्याध्यापक श्री. शिवाजी जगताप, पर्यवेक्षक श्री. आनंद पाटील, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.

नवीन विज्ञान प्रयोगशाळेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध होऊन त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन अधिक सक्षम होणार असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें