एस. एस. इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘विज्ञान प्रदर्शन’ : प्रयोगातून विज्ञानाचा अनुभव

एस. एस. इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘विज्ञान प्रदर्शन’ : प्रयोगातून विज्ञानाचा अनुभव

 

मोहनवाडी | प्रतिनिधी

नंदकुमार बागडेपाटील 

दिनांक ३१ जानेवारी रोजी एस. एस. इंग्लिश मिडियम स्कूल, मोहनवाडी यांच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा व चिकित्सक वृत्तीला चालना मिळावी, या उद्देशाने भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

 

या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी हेमोडायलिसिस, मानवी पचनसंस्था, प्रजनन प्रणाली, मानवी हृदय, भूकंप शोधक, ग्लोबल वॉर्मिंग, ग्रीनहाऊस इफेक्ट, सोलर व विंड पार्क, जलशुद्धीकरण, हायड्रॉलिक ब्रेक, वायू व जल प्रदूषण, ऊर्जा स्रोत, इको-फ्रेंडली पॉवर हाऊस, जल व्यवस्थापन, संतुलित-असंतुलित बल, AI स्मार्ट शेती, अणुऊर्जा संयंत्र, वर्षा जलसंधारण, सौर ठिबक सिंचन, आपदा व्यवस्थापन, कार्बन क्रेडिट, नवीकरणीय ऊर्जा, जलविद्युत प्रकल्प, तापमान सेन्सर, रोबोटिक्स, संगणकाचे भाग, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आदी विषयांवर आधारित नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर केले.

 

भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्रातील मूलभूत संकल्पना प्रत्यक्ष प्रयोगांद्वारे मांडण्यात आल्या. तसेच गणित विषयातील अवघड संकल्पना प्रत्यक्ष मॉडेल्सद्वारे सोप्या व रंजक पद्धतीने सादर करण्यात आल्या. भाषा विभागातील सादरीकरणही विशेष आकर्षण ठरले.

 

या कार्यक्रमास डी.आर.डी.ओ.चे संचालक श्री. नरेश कुमार, सहाय्यक संचालक डॉ. पी. के. चटोपाध्याय तसेच नगरसेवक श्री. सुहास टिंगरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाने सर्व मान्यवर भारावून गेले.

 

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना श्री. नरेश कुमार यांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरण कौशल्याचे, संवाद क्षमतेचे व वैज्ञानिक जिज्ञासेचे विशेष कौतुक केले. अशा उपक्रमांतून विद्यार्थी जटिल संकल्पना सुलभ पद्धतीने समजून घेतात, कल्पकता व नवोपक्रमाला चालना मिळते, असे ते म्हणाले. भविष्यात या शाळेतील विद्यार्थी उत्कृष्ट शास्त्रज्ञ म्हणून नावारूपाला येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कृत्रिम उपग्रह व AI प्रणालींचे त्यांनी विशेष कौतुक केले.

 

डॉ. चटोपाध्याय यांनी शाळा व विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

नगरसेवक श्री. सुहास टिंगरे यांनी उत्कृष्ट प्रकल्प सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक करत प्रशस्तीपत्रकावर स्वाक्षरी करून आपला अभिप्राय नोंदवला.

 

यावेळी शाळेचे संस्थापक श्री. लक्ष्मणराव देवकर यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन करत सांगितले की, आमच्या शाळेत जिज्ञासू वृत्ती, सर्जनशीलता व प्रत्यक्ष कृतीद्वारे शिकण्याला प्राधान्य दिले जाते. प्रयोगातून शिकलेले ज्ञान अधिक परिणामकारक ठरते व विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती, तर्कशक्ती व समस्या सोडवण्याची क्षमता विकसित होते.

 

कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. प्रसिदा रविशंकर, सचिव श्री. संदीप देवकर, पालक व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी विद्यार्थ्यांचे व शाळेचे भरभरून कौतुक केले.

 

 

 

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें