परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी; मुन्ना देसाई यांचा पदाचा राजीनामा

rv ad

परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी; मुन्ना देसाई यांचा पदाचा राजीनामा

हातखंबा गटातील बंडखोरीवर पक्षाची कारवाई, युवासेनेतही बदल

रत्नागिरी | प्रतिनिधी

रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा जिल्हा परिषद गटामध्ये पक्षाने दिलेल्या अधिकृत उमेदवाराविरोधात उघडपणे बंडखोरी केल्याच्या कारणावरून परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. याबाबतची माहिती जिल्हाप्रमुख राहुल पंडित यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

 

परशुराम कदम हे पालकमंत्री उदय सामंत यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते. त्यांनी हातखंबा जिल्हा परिषद गटातून उमेदवारीची मागणी केली होती. मात्र पक्षाने त्यांच्या ऐवजी सुयोग कांबळे यांना अधिकृत उमेदवारी दिली. यामुळे नाराज झालेल्या परशुराम कदम यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करत उघडपणे बंडखोरी केली.

 

पक्षशिस्तीचा भंग करून पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात निवडणूक लढवल्यामुळे परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येत असल्याचे जिल्हाप्रमुख राहुल पंडित यांनी स्पष्ट केले.

मुन्ना देसाई यांचा राजीनामा

दरम्यान, शिंदेसेनेच्या युवासेनेचे रत्नागिरी (दक्षिण) जिल्हाप्रमुख केदार ऊर्फ मुन्ना मधुसूदन देसाई यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख राहुल पंडित यांच्याकडे सादर केला आहे.

राजीनाम्याच्या पत्रात त्यांनी वैयक्तिक अडचणींमुळे युवासेनेच्या जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा देत असल्याचे नमूद केले आहे.

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें