मतदान प्रक्रियेसाठी गुहागरचे प्रशासन सज्ज १४५ मतदान केंद्रांवर ६४० कर्मचारी, १६० पोलिस व होमगार्ड तैनात

highlight

मतदान प्रक्रियेसाठी गुहागरचे प्रशासन सज्ज

१४५ मतदान केंद्रांवर ६४० कर्मचारी, १६० पोलिस व होमगार्ड तैनात

 

गुहागर | ता. ०६ :

गुहागर तालुक्यातील पाच जिल्हा परिषद व दहा पंचायत समिती जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासनाने कडेकोट तयारी केली आहे. तालुक्यातील १४५ मतदान केंद्रांवर प्रत्येकी चार कर्मचाऱ्यांप्रमाणे ५८० कर्मचारी तसेच ६० राखीव कर्मचारी अशा एकूण ६४० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी सुमारे १६० पोलिस व होमगार्ड तैनात करण्यात आले असून, त्यामुळे मतदान प्रक्रियेसाठी गुहागरचे प्रशासन पूर्णतः सज्ज झाले आहे.

 

निवडणूक निर्णय अधिकारी परिक्षित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली १४५ मतदान केंद्रांसाठी १४५ पथके तयार करण्यात आली आहेत. प्रत्येक पथकात केंद्राध्यक्ष, सहाय्यक केंद्राध्यक्ष व दोन मतदान अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. याशिवाय १५ राखीव पथके तयार ठेवण्यात आली असून त्यामध्ये ६० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

 

शृंगारतळी जिल्हा परिषद मतदान केंद्रातील केंद्र क्रमांक २३ व २४ येथे अनुक्रमे सखी मतदान केंद्र व दिव्यांग मतदान केंद्र उभारण्यात आले आहेत. या केंद्रांवर संपूर्ण कामकाज महिला व दिव्यांग कर्मचारी पाहणार आहेत. टीएटी परीक्षेमुळे ८० शिक्षक कर्मचारी उपलब्ध नसल्याने त्यांच्या जागी जिल्हा परिषद व महसूल विभागातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

गुहागर तालुक्यात एकही मतदान केंद्र संवेदनशील नसले, तरीही खबरदारीचा उपाय म्हणून पोलिस निरीक्षक सचिन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक मतदान केंद्रावर एक पोलिस कर्मचारी व केंद्राबाहेर १०० मीटर अंतरावर एक होमगार्ड नियुक्त करण्यात आला आहे. यामध्ये मुंबई येथून ८० पोलिस, मुख्यालयातून २१, तसेच गुहागर पोलिस ठाण्याचे ३५ कर्मचारी सहभागी आहेत.

 

गुहागर तालुक्यातील एकूण १५ जागांसाठी ३८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेच्या ५ जागांसाठी १२ उमेदवार, तर पंचायत समितीच्या १० जागांसाठी २६ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. भाजप, शिवसेना, ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी, बळीराज सेना, बहुजन समाज पार्टी व अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.

 

 

—

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें