पालकमंत्री नाहीतर हे बालक मंत्री आहेत आणि मंद बुद्धीचे नातू – भास्कर जाधव यांचा जोरदार प्रहार

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पालकमंत्री नाहीतर हे बालक मंत्री आहेत आणि मंद बुद्धीचे नातू – भास्कर जाधव यांचा जोरदार प्रहार

आबलोली (संदेश कदम)

निवडणुकीचे प्रचाराचे वातावरण चांगलेच तापले होते काल शेवटचा दिवस होता आणि आरोप प्रत्यारोप होतच होते शृंगारतळी येथे जाहीर सभेत पालकमंत्री उदय सामंत आणि माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांच्यावर जोरदार टीकास्त्र केले होते.या टीकेला उत्तर देताना आमदार भास्कर जाधव म्हणाले पालकमंत्री उदय सामंत बालक मंत्री आहेत. तर मंद बुद्धीचे नातू आहेत. पडवे येथे प्रचार दौरावर आलेले भास्कर जाधव पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, पालकमंत्री बालक मंत्री आहेत आणि मंद बुद्धीचे नातू आहेत असे बोलून त्यांनी एका दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केला.

आमदार भास्कर जाधव पुढे म्हणाले की, पालकमंत्री हे माझ्याबद्दल कधीच काय बोलत नाहीत. पण ते माझ्या विरोधात मोठ्या प्रमाणात राजकारण करतात. त्याचा अनुभव मला आहे. पालकमंत्री यांच्या एकंदरीत थापा तुम्ही ऐकलं तर पालक मंत्र्यांचं भाषण तुम्ही ऐकलं त्यांचा खोटारडेपणा इतका आहे की हे पालकमंत्री नाहीत तर हे बालक मंत्री आहेत अशी म्हणण्याची वेळ आलेली आहे अशी टीकाही आमदार भास्कर जाधव यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केली. ते पुढे म्हणाले की पालकमंत्री हा अत्यंत बालिश माणूस आहे म्हणजे जो कोणी नेता येईल त्याला समोर धरायचा किंवा त्याचे नाव घ्यायचे आणि एवढं – एवढं ते तुमच्यामुळेच झालं मी राजकारणात मोठा झालो तो तुमच्यामुळेच झालो. मला जे काय मिळालं ते तुमच्यामुळेच मिळालं. तुम्ही भेटलात की तुमच्या सारखं बोलायचं जगदीश भेटला की जगदीश सारखं बोलायचं असन अत्यंत बालिश वक्तव्य करणारे पालकमंत्री पालकमंत्री आहेत.

त्यांनी परवाच्या दिवशी एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्र्यांच्या सभेला सांगितलं आता नवीन जिल्हा परिषद सदस्य जे निवडून जाणार आहे त्यांना नवीन इमारतीचं काम आता पूर्णत्व जाताला ते तुम्ही एकनाथराव १०० कोटी रुपये दिलेत म्हणून ती इमारत होतेय. असे सांगून भास्कर जाधव पुढे म्हणाले की अरे नुकतेच ते अजित दादा चार-आठ दिवसापूर्वी गेले काय तरी जाणीव ठेवा? काय तरी नैतिकता ठेवा? केलेला उपकारांची जाण तुम्ही कधीच ठेवणार नाही? पण गेलेल्या माणसाचा आदर तरी ठेवा. त्यांच भाषण माझा मुलगा विक्रांत माजी जि .प .अध्यक्ष याने सगळीकडे प्रसिद्ध केलेय आणि त्या इमारतीच्या भूमिपूजन वेळेला याच उदय सामंत यांनी भाषण केलं की हे जे ७५ कोटी रुपये आले ते विक्रांत मुळे आलेत. आणि अजित दादांनी त्याला पैसे दिलेत .म्हणूनही इमारत पूर्ण होतेय.तेच अजित दादा गेल्याबरोबर साधी त्याबद्दलची काय ना काय तरी बांधिलकी कृतज्ञतांना ठेवणारी माणसे काय करू शकत नाहीत?

 

त्यांचेच चेले महेश नाटेकर आहेत . खरंतर त्यांचं नाव घ्यायला मला आवडत नाही. वास्तविक त्यांनी कळत – नकळत पणे माझी ताकद मान्य केली. हा जर रस्ता मी अडवून ठेवला असे त्यांचे म्हणणे असेल तर केंद्रात सरकार कोणाचं? राज्यात सरकार कोणाचं? पालकमंत्री कोणाचा? खासदार कोणाचे? मी एकटा आमदार याचा अर्थ तुमची सरकार किती असली तरी एकट्या भास्कर जाधवची ताकद आहे की त्याच्या मनामध्ये आणील ते तो करू शकतो हे त्यांनी कबूल केलं पण महेश नाटेकर सारखा माणूस की ज्याच्याबद्दल गावोगाव सांगताहेत येऊ नको बाबा? आता तू इकडे येऊ नको? आठ वर्षांपूर्वी म्हणजे २०१७ म्हणजे नऊ वर्ष सुरू झालंय निवडून लोकांनी दिलं त्याचं काळ कि गोर तोंड त्या भागामध्ये दिसले नाही म्हणून लोकांनी ज्याला घरी बसवायचं ठरवलंय त्याच्याबद्दल फार काय बोलायचं कारण नाही असा टोलाही आमदार भास्कर जाधव यांनी लगावला.

देवखेळ सिरीयल बद्दल पालकमंत्री आमदार उदय सामंत आणि माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी जाहीर सभेत बोलताना आमदार आमदार भास्कर जाधव यांच्याकडे विकास कामांचे कोणतेच मुद्दे नाहीत म्हणून ते देवखेळ सिरीयल बद्दल बोलतात असा आरोप केला होता या आरोपाला उत्तर देताना आमदार भास्कर जाधव पुढे म्हणाले की असा कोण गाढव बोलला मी हा विषय जाहीरपणे कुठे बोललो असा विषय त्या मंद बुद्धीच्या विनय नातूला विचारा कुठं हाय तुझ्याकडे माझं रेकॉर्डिंग.? गुहागर मधले लोक माझ्याकडे आले त्यांनी मला ती क्लिप दाखवली आणि हा संकासुर म्हणजे राक्षस आणि प्रत्येक शिमग्यामध्ये प्रत्येक वर्षाला हा संकासुर गावामध्ये एका माणसाचा खून करतो आणि ही कोकणातली गाव आहेत असं बोलल्यानंतर विनय नातू सारख्या मंद बुद्धीच्या माणसांना गप्प राहण्याची भूमिका घेतली. मी गप्प राहण्याची भूमिका घेतली का? गप्प राहण्याची भूमिका का घेऊ? जर अशा पद्धतीने कोकणात काय नाहीच आहे. आहे का? संकासुर आपल्याकडे विशेष करून कुणबी समाज नाचवतो. ते संकासुर मी त्याची बाजू घेतली मी त्या खेळ्यामध्ये त्यांना सहकार्य केलं उलट मी त्यांना पेन्शन मिळवून दिली म्हणून रामदास कदम, उदय सामंत आणि हे नातू मला संकासुर म्हणून चिडवायचे पण मी काही केलं त्यांना सरकारी पेन्शन मिळवून दिली. आज या सगळ्यांपाठी नातू तर नाहीत ना? कि लोकांचा संकासुराचा खेळ बंद पाडायचा नाही ना? मी तर काहीच कोणाबद्दल एक शब्द ही बोललो नाही. की कोणाबद्दल आक्षेप घेतला नाही. उलट मी त्यांच्याच पक्षाच्या सरकारमधल्या सांस्कृतिक मंत्र्यांना पत्र लिहिलं की, अशी अशी सिरीज आहे. या सिरीज मध्ये माझ्या कोकणाच्या संस्कृती बद्दल, संस्काराबद्दल, रिती – रिवाज आणि परंपरेबद्दल जाणीवपूर्वक कशी एक वातावरण निर्मिती केली जाते की, कोकणातला संकासुर कोणाचा तरी खून करतो. केवढे गंभीर आरोप आहेत हे. खून करतो संकासुर , संकासुर कोण कोण करतो का आपल्या गावचा? मग नातूंना काय ती सिरीज मी बंद करा असे सांगितले. मला असं वाटतंय नातं त्या सिरीज मध्ये पाठीमागून हात तर नाही ना? त्यांना का वाईट वाटलं आणि उदय तर बालिशच आहे. पालकमंत्री म्हणून त्याच मी भाषण ऐकलंय पण या मुक्या माणसाचं भाषण नव्हतं ऐकलं. राजकारण करायचं ते कुठल्या गोष्टीवरून विकास करायचा तेच काम करा काय तू केली विकास कामे या तालुक्यात कुठे होतास तू? मी सामंता बद्दल कधीही गैर बोलत नाही पण सामंतांना बरीच मस्ती आलेय.जर माझं तोंड उघडलं तर सांमतांची बोलती बंद करून टाकीन असा इशाराही आमदार भास्कर जाधव यांनी दिला.

जाहीर सभेत उदय सामंत यांनी असे सांगितले की, मी उद्योगमंत्री असेपर्यंत एखादा तरी कारखाना गुहागरत आणून रोजगार निर्मिती करेन. यावर बोलताना आमदार भास्कर जाधव स्पष्ट म्हणाले की, मी आता डायरेक्ट बोलतो १६ सप्टेंबर २०२४ रोजी यावेळी राजेश सॅंडल यांच्या प्रचारा करिता हेच लोक उदय सामंत आले. आणि त्याच उदय समंतानी सांगितले की, सरळ सरळ त्याच रेकॉर्डिंग आहे आमच्या विक्रांतने ते सगळीकडे वायरल केलंय. याच उदय सामंतानी भाषणात सांगितलं की, आमदारांनी या ठिकाणी एमआयडीसी आणली होती आमदारांचा हट्ट होता एमआयडीसी रद्द करू नका? मी काही करून आज ना उद्या इतर कारखानदाऱ्याने तुम्ही कारखानदारी नाही ना आणत. पण मी कारखानदारी आणेन. लोकांना रोजंदारी ही मिळालीच पाहिजे. पण नातू साहेबांचं मला पत्र आलं आणि मग देवेंद्र फडणवीस यांनी मला फोन केला. एकनाथ शिंदे ने मला फोन केला की, नातू साहेबांना आणि राजेश बेंडल यांना एमआयडीसी नको आहे ना? मी एका सेकंदात ती एमआयडीसी रद्द करून टाकली. हा घ्या कागद. म्हणजे ते एमआयडीसी आल्याशिवाय लोकांना नोकऱ्या कुठून भेटतील? कुठल्या नोकरी देणार आहे हे लोक. सामान्यातल्या सामान्य माणसाला आता बोलण्यासारखं बरंच आहे ३५ वर्ष राम मंदिर म्हणतो म्हणून त्याच्यामध्ये गुंतून ठेवलं त्याच्यानंतर ऐनरॉन आल.ऐनरॉन आलं तर इंग्रज पण येईल आणि सगळा देश ताब्यात घेईल. ऐनरॉन कंपनी आली तर लोकांच्या म्हणजे महिलांच्या पोटामध्ये पोरं बाळ वेडी वाकडी होतील, मुकी होतील, मोनी होतील, कोणाचा हात तुटलेला असेल, कोणाचा पाय तुटलेला असेल असं काय ना काय तरी भावनिक केलं आणि ऐनरॉन आणलं परत घालवलं परत आणलं तिथे ठेकेदार कोण आहेत. मी आहे? ठेकेदार कोण आहेत? या स्वतः नातून पासून ठेकेदार सगळे ठेकेदार तिथे आहेत. माझ्यावर आरोप करताना विचार करा. मी तर कधीच कुणावर आरोप करत नाही. त्याच्यामुळे आता ते काय बोलले ते गेले खड्ड्यात त्यांची फार किंमत करायची मला गरज नाही ना तुमचं डोकंच फिरलय असं मला वाटतं माझ्या आई बहिणी वरून शिव्या दिल्यानंतर त्याबरोबर कसं म्हणून सांगतो तो माणूस टाळ्या वाजवतो तो माणूस. ज्याच्यावर संस्कार नाही संस्कृती नाही विकृत माणूस काय बोलला त्याबद्दल मला प्रश्न विचारू नका असा सल्लाही पत्रकारांना आमदार भास्कर जाधव यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिला.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]