निर्मल ग्राम पंचायत काताळे व गुहागर पंचायत समिती यांच्या पाटबंधारे अभिनयाला उस्फुर्त प्रतिसाद 

निर्मल ग्राम पंचायत काताळे व गुहागर पंचायत समिती यांच्या पाटबंधारे अभिनयाला उस्फुर्त प्रतिसाद 

 

गुहागर – तवसाळ, 

यंदा पावसाने दडी मारल्यामुळे

संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत निर्मल ग्राम पंचायत काताळे यांच्या वतीने जलसंधारणाचा उपक्रम राबविण्यात आला. सन २०२६-२७ च्या मिशन बंधारे अभियानांतर्गत गावातील ग्रामस्थांनी श्रमदानातून ५/६ वनराई बंधारे उभारले. या उपक्रमात गावातील महिलांनीही लक्षणीय सहभाग नोंदवला. ग्रामस्थांच्या सामूहिक श्रमदानातून बंधाऱ्यांच्या उभारणीचे काम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले.

 

मिशन बंधारे अभियानांतर्गत वनराई बंधाऱ्यांची उभारणी करून हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी गुहागर पंचायत समिती सभापती व उपसभापती श्री निलेशजी सुर्वे साहेब व माजी सरपंच –  सौ्. प्रियंका सुर्वे मॅडम ग्रामपंचायत कर्मचारी सह अनेक युवा तरुण मोलाचे सहकार्य केले. ग्रामपंचायत हद्दीतील काताळे नदी वरती बंधारा तर श्री महामाई सोनसाखळी मंदिर शेजारी नदी वरती बंधारा तर तवसाळ मोहीतेवाडी बंधारा बांधण्यात आला. तवसाळ तांबडवाडी मधिल ग्रामस्थ व महिला मंडळ यांनी श्रमदान केले

जलसंधारणाच्या या उपक्रमातून पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ग्रामस्थांनी एकजुटीने पुढाकार घेतला. दरवर्षी बंधारे बांधण्यात येतात तर पावसाचे पाणी अभावी लवकर नियोजन करण्याची यशस्वी वनराई बंधारे बांधण्यात आले

उपलब्ध माहितीनुसार – बातमीदार, सचिनकुळे

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें